शेतकरी, मेंढपाळांच्या संरक्षणार्थ बच्चु कडूंचा हुंकार.
शेतमालाचा भाव, पीक कर्ज, मेंढपाळांना न्याय देण्यासाठी ‘वाडा आंदोलन’.
अमरावती,
विधानसभा निवडणूकांनतर देशाच्या अर्थव्यवस्थेचा व ग्रामीण भागाचा कणा असलेल्या शेतक:यासाठी सत्ताधा:यांनी ‘गरज सरो वैद्य मरो’ ची भूमिका घेतली असल्याचे दिसत आहे. एकीकडे नविन वर्षात रासायनिक खतांमध्ये वाढ करण्याची भूमिका सरकार घेत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला जवळजवळ 50 टक्क्यांनी कमी भाव मिळत आहे.
राज्यातील मेंढपाळ आपल्या न्याय मागणीकरिता सरकारचे उंबरठे झिजवित असताना त्यांच्या मागण्यांच्या संबधात मुख्यमंत्री कुठलेही ठोस पाऊल उचलत नाहीत. शेतकरी व मेंढपाळ वाचला पाहीजे याकरिता पुन्हा एकदा बच्चू कडू हुंकार भरत राज्य सरकार विरुध्द जनआंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. सोमवारी पत्रकार परिषदेतून बच्चू कडूंनी याची माहिती देत नविन वर्षात शेतकरी व मेंढपाळांसाठी आंदोलन छेडून सरकारला सडो की, पडो करण्याचा संकल्प घेतला.बच्चु कडूंनी सांगितले की,सोयाबीन, तूर, कापसाला दिवसेंदिवस भाव वाढ मिळायला पाहीजे. मात्र या उलट या पिकांचे भाव कमी होत जाताना पहायला मिळत आहे. सोयाबीन 7 हजाराहून 3500 रुपयांवर आले, तूर 13 हजार रुपये क्विंटलहून 7 हजार रुपये क्विटलवर आली. कापसाला काही दिवसांपुर्वी 10 हजार रुपये प्रती क्विंटल भाव मिळायचा, आज कापसाला 7000 रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. दुसरीकडे बियाणे, रासायनिक खते, शेणखताचे भाव वाढत जात आहे. अशी परिस्थिती असताना शेतक:यांनी 12 महिने आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा? असा सवालही कडू यांनी यावेळी सरकारला विचारला. या परिस्थितीमूळे शेतक:यांचे जगणे कठीण झाले आहे, आणि त्यामूळेच शेतकरी आत्मघातकी निर्णय घेवू लागला आहे. हा शेतकरी वाचवायचा असेल तर त्याचे संरक्षण होणे महत्वाचे आहे. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, वण्यप्राण्यांपासून त्याच्या पिकाचे संरक्षण झाले पाहीजे, त्याला पीक नुकसानीचे पिक विम्याव्दारे भरपाई मिळणे गरजेचे आहे, राज्य सरकारने विधानसभा निवडणूकीच्या काळात घोषीत केलेली सरसकट कर्जमाफी शेतक:यांना तातडीने मिळावी, चराईकरिता परराज्यातून येणा:या मेंढपाळांवर बंदी घालण्यात यावी,
..तर बँका डूबतील
सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी. कर्जमाफी करताना आपली भूमिका सूस्पष्ट करावी. कारण या आधीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन 2017 मध्ये जी कर्जमाफी झाली होती यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण पात्र लाभार्थी 97,892 होते त्यांची एकूण रक्कम 487.08 कोटी होते त्यापैकी बँकेला प्राप्त कर्जमाफी लाभार्थी संख्या ७४५१७ असून मिळालेली कर्जमाफीची रक्कम 317.0 कोटी आहे वंचित राहिलेले एकूण सभासद संख्या 23 हजार 375 असून त्यांची रक्कम 170.02 कोटी आहे. एक समजवता योजनेमध्ये एकूण लाभार्थी संख्या 2046 असून त्यांची रक्कम 19.31 कोटी प्राप्त झाली परंतु एक समजवता योजनेमध्ये वंचित राहिलेली लाभार्थी संख्या 1458 असून त्यांची रक्कम 78.13 कोटी अजून बँकेला येणे बाकी आहे. या दोन्ही योजनेमध्ये वंचित राहिलेली एकूण लाभार्थी संख्या 45021 असून त्यांची एकूण रक्कम 269.79 कोटी येणे बाकी आहे. त्या प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना 2019 शासनाने प्रसिद्ध केलेल्या ग्रीन लिस्ट नुसार मंजूर केलेली लाभार्थ्यांची संख्या 47 हजार 336 असून कर्ज रक्कम ३०६.१९ कोटी आहे. वंचित असलेली लाभार्थी संख्या 2578 असून त्यांची रक्कम 48.05 कोटी एवढी आहे सदर योजनेमध्ये दोन लाखावरील घोषणा करण्यात आली परंतु परिपत्रक निघाले नसल्यामुळे या रकमेमध्ये सुद्धा सभासदाकडून बँकेला घेणे बाकी आहे.सन 2012 च्या स्थितीनुसार थेट व संस्था पातळीवरील थकीत असणाऱ्या संस्था संख्या 630 ची एकूण रक्कम 74.69 कोटी घेणे बाकी होती. आजच्या स्थितीनुसार एकूण थकीत सभासद संख्या 45 हजार 038 असून थकीत रक्कम रुपये 318.08 कोटी बँकेला थकीत घेणे बाकी आहे.
https://epaper.vidarbhaprajasattak.com