प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
दि.३१अमरावती १४
अचलपूर तालुक्याचे विद्यमान आमदार प्रवीण वसंतराव तायडे यांनी सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी श्रीक्षेत्र बहिरम येथे प्रसारमाध्यमांमध्ये तसेच त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या भाषणामध्ये आमचे नेते माजी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांचे विरुद्ध खोटे आरोप प्रत्यारोप करून अश्लील भाषेत शिवीगाळ करून तसेच मारहाण करण्याची धमकी दिलेली आहे. विद्यमान आमदार खोट्या मार्गाने विजय तर मिळविला परंतु त्याना आता हा खोटा नकाब रुतत असल्याने त्याचेच मुखातून बच्चू कडू व त्यांचे कार्यकर्त्यांचा रोज 100 वेळा नामजप केल्याशिवाय दिवस जात नाही. आपल्या सार्वजनिक भाषणामध्ये एक हश्या पिकविण्याकरीता आणि मी कसा क्रिमिनल माईड मास्टर आहे. याचे प्रदर्शन त्यांचे बोलण्यातून होत आहे. त्यांनी असे नमूद केले की माजी आमदार यांना पराभव पचत नसल्यामुळे ते त्यांच्याविरुद्ध कृत्य करीत आहे.त्यामुळे आमदार प्रवीण तायडे यांनी दिलेल्या धमकी व केलेल्या अश्लील चिथावणीखोर भाषण विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांसह ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या कऱण्यात आली
आमदार प्रवीण तायडे यांनी भाषणामध्ये असे सुद्धा बेकायदेशीर रित्या नमूद केले की, त्यांनी वेळ सांगावी व किती कार्यकर्ते असेल त्यांना घेऊन यावे असे चिथावणीजनक भाषण व समाजामध्ये व कार्यकत्यांच्या भावना दुखेन यासाठी तसेच दोन परस्पर विरोधी पक्षांमध्ये तेढ निर्माण होईल. या दृष्टिकोनातून केलेले आहे त्यामुळे विनाकारण श्रीक्षेत्र बहिरम येथे आमदार प्रवीण तायडे यांनी लावलेल्या पोस्टरची जी विटंबना झालेली आहे त्या विटंबनाची कोणत्याही प्रहार पक्षाच्या कार्यकत्यांचा अथवा वैयक्तिकरित्या बच्चु कडू यांचा कुठलाही संबंध नसतांना अशा प्रकारचे बेकायदेशीर कथन विद्यमान आमदार प्रवीण तायडे यांच्याकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे आम्हा प्रहार पक्षाच्या सर्व कार्यकत्यांच्या भावना दुखावल्या असून वैयक्तिकरित्या माजी आमदार याना विनाकारण प्रवीण तायडे यांनी अश्लील आषेत शिवगाळ केलेली आहे. है विद्यमान आमदाराचे कृत्य बेकायदेशीर असून फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. तरी सदर विद्यमान आमदारांवर कायदेशीर कारवाई होऊन गुन्हयाची नौद करण्यात अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून कऱण्यात आली.