शहर पोलीस आयुक्तांसह अमरावती शहर पोलिसांची रात्रभर गस्त
मद्यपी वाहन चालकांविरोधात ड्रंक अँड ड्राइव्ह मोहिम
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१अमरावती
थर्टी फस्टच्या आनंदोत्सवात कोणताही अनुचितप्रकारघडूनये म्हणजे शहरातील सर्वत्र पोलिसांची बंदोबस्त होता. या बंदोबस्ताचा आढावा घेत स्वतः पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डीयांनी थर्टी फर्स्टच्या रात्री १२ वाजता स्वतः ऑन रोड शहरातील बहुतांश भागात पाहणी केली. विशेषतः राजकमल चौकात पोहचून पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त सागर पाटील , गणेश शिंदे व अन्य पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी दुचाकी चालकांची बारकाईने तपासणी करण्यात आली. पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी स्वतः बंदोबस्ता विषयी निर्देश दिले.
सुरक्षेच्या दृष्टीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. यावेळी पोलिस आयुक्तालया तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पेट्रोलिंगमध्ये सहभाग घेतला. शहरातील प्रमुख चौकावर पोलिसांचा कडक बंदोबस्त होता. तसेच उड्डाणपुलावर बॅरिकेटस लावून वाहतूक बंद करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत शहरात ठिकठिकाणी पोलिस दिसून येत होते. गाडगेनगर, राजापेठ, वेलकम पॉईंट,पंचवटी, उड्डाणपुलच्या दोन्ही बाजुनी बॅरीकेटस लावले होते. इर्विन चौक, राजापेठ, जयस्तंभ, गाडगेनगर, राजकमल या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त होता. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंकन ड्राईव्ह अंतर्गत तपासणी करण्यात आली.
येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. ड्रंकन ड्राईव्ह अंतर्गत तपासणी करण्यात आली.
सरत्या वर्षाला निरोप देत नागरिकांचा जल्लोष सुरु होता. तर दुसरीकडे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मंगळवारला सायंकाळी ६ वाजतापासूनच ८० अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात ८०० पेक्षा अधिक पोलिस शहरातील विविध चौकांसह विविध भागात तैनात होते. एवढेच नाही तर मद्यपी वाहन चालकांच्या मुसक्या आवळण्यासाठी ड्रंकन ड्राईव्ह मोहिम सुद्धा राबविण्यात आली. तर फिक्स पाईन्ट व नाकाबंदीव्दारे प्रत्येकावर पोलिसांची करडी होती.सायंकाळी ६ वाजतापासून ते १ जानेवारीच्या पहाटे ५ वाजेपर्यंत डीसीपी, एसीपी, पीआय, एपीआय, पीएसआय अशा ८० अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात तब्बल ८००. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता. सोबतचगुन्हे व वाहतुकशाखेचीविविधपथकांचीशहरात गस्त रात्रभर सुरु होती. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख चौकांमध्ये बॅरिगेट लाऊन नाकाबंदी करून संशयितांची तपासणी करण्यात येत होती.
आमच्या साईट ला अवश्य भेट द्या !
https://epaper.vidarbhaprajasattak.com
https://epaper.vidarbhaprajasattak.com
अमरावती मधून नियमित प्रकाशित होणारा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वाचा आता आपल्या मोबाईलवरच आमच्या ग्रुपला आजच जॉईन व्हा !