लातूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव; उदगीर शहरात ५० कावळ्यांचा मृत्यू
लातूर :
पक्षांमध्ये उद्भवणारा बर्ड फ्लू आज डोके वर काढले आहे. यात लातूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील उदगीर शहरात ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृत कावळ्यांची तपासणी केली असता बर्ड फ्लूने मृयू झाल्याचे समोर आले आहे. सदरची बाब निदर्शनास आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिकात्मक उपाय योजना राबवण्याच आव्हान आहे.
पक्षांमध्ये प्रामुख्याने बर्ड फ्लूचा आजार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील काही वर्षांपूर्वी कोंबड्यांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात झाल्याने यात हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर आता लातूरमध्ये पुन्हा बर्ड फ्लूने डोके वर काढल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा प्रशासनाकडून तातडीने उपास योजना करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
मागच्या चार दिवसांपासून उदगीर शहरात अनेक ठिकाणी कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. अचानक जवळपास ५० कावळ्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान या कावळ्यांच्या मृत्यू बाबत अहवाल मागवण्यासाठी नमुने भोपाळ येथील वैद्यकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले होते. मात्र आता हे प्रयोगशाळेतील नमुने प्राप्त झाले आहेत. यात या कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्ल्यूने झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतीकात्मक उपाय योजना सुरू केल्या.
दहा किलोमीटर क्षेत्रात अलर्ट झोन
कावळ्याचा मृत्यू झालेल्या परिसरात दहा किलोमीटर परिसर अलर्ट झोन करण्यात आला. बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे. बाधित क्षेत्रात कुक्कुट पक्षांचे सर्वेक्षण आणि वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत. नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये; अस आव्हान देखील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येते आहे.