बहिरमच्या यात्रेत मातीच्या हंडीत शिजणाऱ्या मटणाचे खास वैशिष्ट्य, खवय्यांची तोबा गर्दी
बहीरम
अमरावती जिल्हातील बहिरम येथे बहिरम बाबाची यात्रा ही विदर्भातील सर्वाधिक काळ म्हणजे सव्वा महिने चालणारी यात्रा आहे, या ठिकाणी संपूर्ण 40 दिवस तुफान गर्दी राहते, मातीच्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असताना, या यात्रेत मिळणाऱ्या मातीच्या हंडी खवय्ये मोठ्या आवडीने खरेदी करतात. या यात्रेत विविध वैशिष्ट्यांपैकी मातीच्या हंडीत मटन शिजवण्याची प्रथा ही एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मातीच्या हंडीत शिजवलेले लज्जतदार झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी बहिरमच्या यात्रेत उसळते. येथे येणारे भाविक संपूर्ण वर्षभर मटण शिजवावे याकरिता आपल्या मोठ्याप्रमाणात हंडी घेऊन जातात. खास जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो विशेष म्हणजे मटणासोबत खाण्यासाठी रोडगे असतात. मटन आणि त्यासोबत रोडगे खाण्यासाठी खवय्यांची चंगळ पाहायला मिळते.
एक किलो मटन तयार करून देण्यासाठी एवढे शुल्क आकारतात लाल रंगाच्या मातीने खास अशी हंडी तयार केली जाते. बहिरम येथील पाणी हे अतिशय चवदार असून मातीची हंडी आणि या चवदार पाण्यात शिजणारे मटण अतिशय चविष्ट असल्यामुळे या यात्रेत खास करून मटण खाण्यासाठी विदर्भातील सर्व दूरवरून खवय्ये येतात. यात्रा परिसरात खवय्ये मटण खरेदी करतात आणि यात्रेत असणाऱ्या जवळपास 40 ते 50 मातीच्या हंडीत मटन बनविणाऱ्या हॉटेलमधून ते तयार करून घेतात. एक किलो मटन तयार करून देण्यासाठी या तात्पुरत्या हॉटेलचे चालक 400 ते 500 रुपये आकारतात.
मातीच्या चुलीवर शिजवले जातेय मटण एक जानेवारीपासून ही यात्रा नेहमीप्रमाणे भरली आहे. मातीच्या हंडीत मटण तयार करून देणारी हॉटेल या यात्रेत फाटली आहेत या ठिकाणी मातीच्या चुली साकारून त्या चुलींची विधिवत पूजा केली जाते मातीच्या हंडीची ही पूजा केल्यानंतर त्यात मटण शिजवण्यात येते त्यानंतर खास जमिनीवर बसून मटणावर ताव मारण्यात येतो विशेष म्हणजे मटणासोबत खाण्यासाठी रोडगे असतात. मटन आणि त्यासोबत रोडगे खाण्यासाठी बहिरमलकांच्या जंगल परिसरात खवय्यांची चंगळ पाहायला मिळते.
मातीच्या हंडीची होते मोठ्या प्रमाणात विक्री बहिरम यात्रेत मातीच्या हंडीतील मटण खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत असताना, या यात्रेत मिळणाऱ्या मातीच्या हंडी खवय्ये मोठ्या आवडीने खरेदी करतात. बहिरमच्या यात्रेत दरवर्षी 30 हजारापर्यंत मातीच्या हंडीची विक्री होते. या यात्रेत विविध वैशिष्ट्यांपैकी मातीच्या हंडीत मटन शिजवण्याची प्रथा ही एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मातीच्या हंडीत शिजवलेले लज्जतदार झणझणीत मटणावर ताव मारण्यासाठी खवय्यांची गर्दी बहिरमच्या यात्रेत उसळते. येथे येणारे भाविक संपूर्ण वर्षभर मटण शिजवावे याकरिता आपल्या मोठ्याप्रमाणात हंडी घेऊन जातात.