अमरावतीच्या सोनरी गावात चक्क विद्युत खांबावर बसून शेतकऱ्याचे अनोखे उपोषण..
चांदुर बाजार
घराच्या समोर असलेला रस्त्यावरील विद्युत खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी विलास चर्जन यांनी चक्क विद्युत पोलवर खाट बांधून जीव धोक्यात घालत सुरू केलं उपोषण..
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी येथील ही घटना आहे..
यापूर्वीही चर्जन यांनी विहिरीत बसून आंदोलन केले होते वारंवार विद्युत खांब काढण्यासंदर्भात तक्रारी करून देखील पोल हटवण्यात न आल्याने चर्जन यांनी अनोख्या उपोषणाला आजपासून सुरुवात केली आहे..या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय.विशेष म्हणजे महावितरण कंपनीने हा विधुत पोल काढण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे