सायन्सकोर मैदानात सुरु असलेल्या मिनी सरस प्रदर्शनीला रविवारी मिळाला उस्फुर्त प्रतिसाद
लाखोंची झाली उलाढाल
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२७अमरावती
बचतगटांच्या विविध समुहांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता दरवर्षी प्रदर्शनी घेऊन तसेच इतर जिल्ह्यातील प्रदर्शनीमध्ये स्थानिक बचतगटांना स्थान देण्याचे काम उमेदने केले आहे. अशातून महिला ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून खऱ्या अर्थान काही बचतगटातील महिलांनी या विविध गृह व्यवसायात भरारी घेतली आहे.रविवारी या प्रदर्शनीला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला
गेल्या तीन दिवसांपासून सायन्सकोट मैदानावर मिनी सरस प्रदर्शनी सुरु आहे रविवार २६ जानेवारी रोजी या प्रदर्शनीत लाखो अमरावतीकरांनी भेट देत अनेक वस्तू खरेदी केल्यात त्यामुळे रविवारी या मिनी सरस प्रदर्शनीत लाखोंची उलाढाल झाली.
सायन्सकोर स्थित या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील ६५ स्वयं सहाय्यता समूह तसेच इतर जिल्ह्यातील १० स्वयं सहाय्यता समूह असे एकूण ७५ समूहाचे स्टाँल लावण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात आल्या आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
२८ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून नागरीकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे. या प्रदर्शनीमध्ये नागरिकांना मिक्स मिलेट्स कडधान्य, सर्व प्रकारचे मसाले, डिंक लाडू, पंचरत्न लाडू, मोह लाडू, डिंक लाडू, ज्वारी, बाजरी, सोया प्रोडक्ट्स, सोया इडली, ढोकळा, मोरिंगा पावडर, हळद पावडर, सर्व प्रकारची लोणची, खारोडी, मुगवडी, जवस चटणी, खंडू चक्का तेल, शुद्ध देशी गाईचे तूप, गाईचे शेणापासून बनविलेल्या धूपबत्ती, मकरसंक्रांतनिमित्त हलव्याचे दागिने, तीळ-गुडिया व बांबू पासून विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
————————————————————–