सायन्सकोर मैदानात सुरु असलेल्या मिनी सरस प्रदर्शनीला अमरावतीकरांचा प्रचंड प्रतिसाद
चिखलदर्याची रबडी,कलाकंद,स्ट्रॉबेरी ला पसंती
अमरावती
बचतगटांच्या विविध समुहांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता दरवर्षी प्रदर्शनी घेऊन तसेच इतर जिल्ह्यातील प्रदर्शनीमध्ये स्थानिक बचतगटांना स्थान देण्याचे काम उमेदने केले आहे. अशातून महिला ह्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असून खऱ्या अर्थान काही बचतगटातील महिलांनी या विविध गृह व्यवसायात भरारी घेतली आहे. शक्रवारी या प्रदर्शनीचे थाटात उदघाटन झाल्यानंतरसायंकाळी या प्रदर्शनीला अमरावतीकरांनी भरघोस असा प्रतिसाद दिला असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
सायन्सकोर स्थित या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील ६५ स्वयं सहाय्यता समूह तसेच इतर जिल्ह्यातील १० स्वयं सहाय्यता समूह असे एकूण ७५ समूहाचे स्टाँल लावण्यात आले आहे. या प्रदर्शनीमध्ये ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समूहाद्वारे उत्पादित विविध खाद्य पदार्थ, तसेच इतर आकर्षक वस्तू नागरिकांना खरेदी करिता ठेवण्यात आल्या आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील मुख्य आकर्षण असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याची स्ट्रॉबेरी,रबडी आणि कलाकंद याची उत्पादक शहर म्हणूनच ओळख समोर येत आहे.
शेतकरी आता पारंपरिक पिकांपेक्षा नगदी पिकांवर भर देत आहे. यातूनच स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात वाढ होत आहे. शिवाय तीन महिन्यात अथक परिश्रम घेऊन उत्पादन पदरी पाडायचे हा निर्धारच शेतकरी करीत आहेत.तर इतर शेतकरी दुधा पासून बासुंदी,रबडी,तूप,पनीर, या सारख्या उद्योगास पसंती देत आहे आणी याचेच स्टोल या प्रदशनीत लावण्यात आले आहे.बासुंदी,कलाकंद आणि रबडी अमरावतीकरांच्या पसंतीस उतरले आहे.
२८ जानेवारी पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून नागरीकांना याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.विशेष म्हणजे त्यांनी प्रत्येक स्टोल ला भेट देत खरेदी ही केली.