शिरजगाव मोझरी परिसरातील मालधुर शेतशिवारातील विहिरीत आढळला बिबटया,अफवा अवतरली साक्षात
विजय क्षिरसागर
शिरजगाव मो.
तिवसा तालुक्यातील मोझरी ते शिरजगाव रस्त्याने मोझरी शेतशिवारलगत बिबट्या दिसल्याची चर्चेला काही दिवसापूर्वी चांगलेच उद्यानं आले होते. दि.८जानेवारी रात्री ८ते ९ दरम्यान अंदाजे अडीच फूट उंच असलेला बिबट्या दिसल्याची चर्चा पसरल्याने शिरजगाव ते मोझरी मार्गाने रोज छोटेमोठे व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.याविषयी वामविभागाला माहिती देऊन वनविभागाने पाहणी करून बिबट असल्याचे कोणतेच ठोस पुरावे न मिळाल्याने परिसरात बिबट्याचा वावर नसाल्याचे निष्पन्न झाले.आणि नागरिकांतील बिबट्याची दहशत कमी झाली.
परंतु बिबट्याच्या पुनःआगमनाचे वृत्त असे तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी लगत असलेल्या मालधुर येथील अरविंद साबळे यांच्या शेतात तूर कापणी सुरु असतांना मंजूर वर्ग पाण्यासाठी विहरीवर गेले असता त्यांना विहिरीत बिबट असल्याचे आढळून आले.जिवंत बिबट विहिरीत पाहताच मजुरांनी शेतमालक अरविंद साबळे, सतिश साबळे तथा मोझरीचे सरपंच सुरेंद्र भिवगडे कळविले व वनविभागाला प्रचारण करण्यात आले.तिवसा वनविभागातील अमोल चौधरी वनपरिक्षेत्र अधिकारी, एस.घोडमारे वनपाल कु.पायल अंबाडकर वनरक्षक मनोहर वनवे वनमजुर. गजानन राऊत मजुर व रेस्क्यू टिमसह विहिरीत रेस्क्यू करून बिबट्याला बाहेर काढण्यात आले.चांदुर रेल्वे परीक्षेत्र येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले.