
मेळघाट च्या आमदारांचा आदिवासी विद्यार्थ्यांशी शाळेत मुक्काम करून संवाद
विदर्भ प्रजासत्ताक
दि.८धारणी
संवाद चिमुकल्यांशी’ अभियानांतर्गत आदिवासी विकास मंत्री प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या आदेशाने चिखलदरा तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा,डोमा येथे मुक्काम केला. येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासोबतच त्यांनी आश्रमशाळेतील सोई-सुविधांची पाहणी केली. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके साहेब यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले राज्यातील सर्व आश्रमशाळा शैक्षणिक गुणवत्तेने परिपूर्ण करु, असे ते यावेळी बोलतांना म्हणाले.

विद्यार्थ्यांला आश्रमशाळेत टाकतांना येथे उत्तम दर्जाचे शिक्षण व सुविधा उपलब्ध होते, अशी भावना पालकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे. त्यासाठी आश्रमशाळांचे अधिक्षक, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न व अध्यापन करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना पुढील उच्च शिक्षण देखील एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा आपला प्रयत्न आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास साधण्यासाठी सामुहिकपणे प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी आमदार केवलराम काळे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी मावसकर,मुख्याध्यापक चौधरी सर,वाढवे सर,दोरे सर,अधीक्षक काणे सर,अधिक्षिका उज्जैनकर मॅडम,रवी बेलसरे,आकाश खैरकर,स्वप्नील भक्ते,शिक्षक,शिक्षिका,कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.