
शहरात टेक्सस स्मोक शॉप वर पोलिसांनी धाड; 3 लाख रुपयांच्या प्रतिबंधित ई सिगरेट जप्त…
विदर्भ प्रजासत्ताक
दि.8अमरावती
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या टेक्सस स्मोक शॉप वर अमरावती शहर पोलिसांनी पथकाने धाड टाकून 3 लाख रुपयांच्या ई सिगारेट जप्त करण्यात आल्या.. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये खुलेआम पणे गेल्या अनेक दिवसांपासून याठिकाणी प्रतिबंधित असलेल्या इ सिगारेट विकल्या जात होती. तसेच या ठिकाणी अल्पवयीन मुलांचा मोठ्या प्रमाणावर वावर होता.

यावेळी एकूण 3 लाख रुपये किंमतीची 55 पॉकेट इ सिगरेट चे पॉकेट जप्त करण्यात आले आहे, ई-सिगारेटमध्ये निकोटीन व आॅरगॅनिक व्होलाटाईल सॉल्व्हट हे मानवी आरोग्यास अपायकारक घटक आहे.

ई-सिगारेट ओढण्याचे प्रमाण तरुणांमध्ये वाढत असून त्यावर आळा घालण्यासाठी अनेक स्तरावरून कामे सुरू आहेत.