
ज्यांना मालक होण्याचा गर्व झाला होता…; दिल्ली विजयानंतर मोदींचे कार्यकर्त्यांना संबोधन
विदर्भ प्रजासत्ताक
दि.८ नवी दिल्ली
दिल्लीतील २७ वर्षांनंतरच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक नेत्यांनी भाजपाच्या मुख्यालयामध्ये विजयाचा आनंद साजरा केला. यावेळी मोदी यांनी आपवर निशाना साधला. हा ऐतिहासिक विजय आहे, दिल्लीच्या लोकांनी आप-दा ला बाहेर केले आहे. आज अहंकार, अराजकतेचा पराभव झाला आहे. ज्यांना मालक होण्याचा गर्व होता, त्यांचा खऱ्याशी सामना झाला आहे, अशा शब्दांत मोदींनी आपला तसेच केजरीवालांना टोला लगावला आहे.
दिल्लीतील प्रचंड विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. मला दिल्लीच्या जनतेने कधी निराश केले नाही. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सातही जागांवर विजय दिला आहे. भाजपला २१ व्या शतकात सेवा करण्याची संधी द्यावी, असे मी आवाहन केले होते. मोदींच्या हमीवर विश्वास ठेवल्याबद्दल मी दिल्लीच्या जनतेचे आभार मानतो, असे मोदी म्हणाले. शॉर्टकट राजकारणाचा शॉर्ट सर्किट झाल्याचा टोला मोदींनी लगावला. तत्पूर्वी जे पी नड्डा यांनी देखील आपवर टीका केली. पूर्वी राजकारण म्हणजे लोकाभिमानी भाषणे देणे आणि नंतर ते विसरून जाणे असे होते, परंतु पंतप्रधान मोदींनी राजकारणात बदल घडवून आणला. मी जे बोललो ते केले आणि जे बोललो नाही तेही केले. ही निवडणूक सर्वात बेईमान नेत्याला आणि सर्वात बेईमान पक्षाला संदेश देईल. ज्यांनी कचरा हटवण्याचे म्हटले, त्यांनी प्रत्येक घरासमोर कचरा टाकला. शिक्षणाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणाऱ्यांनी दिल्लीतील दोन तृतीयांश मुलांना विज्ञान शिकण्यापासून दूर ठेवले. जे चांगल्या रस्त्यांबद्दल बोलत होते, त्यांनी लोकांना खड्ड्यांतून चालण्यास भाग पाडले. जनतेने अशा पक्षाला घरी पाठवले आहे, असे नड्डा म्हणाले.
स्वतःला पूर्णपणे प्रामाणिक असल्याचा दावा केला ते पूर्णपणे भ्रष्ट निघाले. तुरुंगात वेळ घालवून त्यांचे नेते परत आले आहेत. तर काँग्रेस शुन्यावर आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. यामुळे, आम्ही इतिहास घडवला असल्याचे नड्डा म्हणाले.
—–