
नागपुरातही ताज हॉटेल उभारणार, ताज ग्रुपची घोषणा; मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला एका मिनिटात मान
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०नागपूर
दि.१०नागपूर
नागपुरातही आता ताज ग्रुपची एन्ट्री होणार आहे. ताज ग्रुपने नागपुरात ताज हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेलची निर्मिती झाली पाहिजे, अशी इच्छा बोलून दाखवली. मुख्यमंत्र्यांचं भाषण होताच ताज ग्रुपने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत मिनिटभरातच नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे आता नागपूरकरांना लवकरच ताजमध्ये जाण्याचा योग येणार आहे.


वांद्रे परिसरात इतक्या सुंदर हॉटेलची उभारणी करत असल्याबद्दल मी इंडियन हॉटेलचे आभार मानतो. हे हॉटेल रतन टाटा यांच्या अत्यंत जवळचे होते. हॉटेल उभारणीत काही अडचणी येत असल्याचं त्यांनी एकदा मला सांगितलं होतं. या हॉटेलच्या प्लानिंग आणि डिझाईनमुळे मुंबईच्या सुंदरतेत आणखी भर पडणार आहे.

ताज ग्रुपचम महाराष्ट्रात चांगलं प्रस्थ आहे. पण ताज ग्रुपचं नागपुरात हॉटेल नाही. ताज ग्रुपने नागपुरात हॉटेल उभारलं पाहिजे. तुम्ही आजच याबाबतची घोषणा करावी अशी माझी इच्छा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.