
राणा दांपत्य १२ ते १४ फेब्रुवारी प्रयागराज मध्ये मुक्कामी
महाकुंभ मेळामधील त्रिवेणी संगम येथे पवित्र स्नानाचा घेणार लाभ
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०अमरावती
144 वर्षानंतर आलेल्या प्रयागराज येथील भव्य महाकुंभ मेळाचे आयोजन करण्यात आले. प्रयागराज येथील गंगा यमुना सरस्वती या तिनही नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमामध्ये आतापर्यंत जगातील कोट्यावधी भाविक भक्तांनी स्नान करुन या पवित्र स्नानाचा लाभ घेतला त्या अनुषंगाने भारतीय संस्कृती व परंपरा जोपासून जनतेमध्ये वावरणारे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ.रवि राणा व मा.खा.नवनित राणा हे सुद्धा प्रयागराज येथील सुरु असलेल्या महाकुंभ मेळामध्ये 12 ते 14 फेब्रुवारी असे 3 दिवस मुक्काम करणार असुन त्रिवेणी संगमामध्ये स्नान करुन या पवित्र स्नानाचा लाभ घेणार आहे.
तसेच या भव्य दिव्य महाकुंभ मेळामध्ये श्री.शिवमहापुराण कथावाचक श्री.प्रदिपजी मिश्रा यांच्या अमृतवाणीतून श्री.शिवमहापुराण कथेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.
त्यामुळे श्री.शिवमहापुराण कथेमध्ये सुद्धा सहभाग घेवून व कथा ऐकण्याचा आस्वाद घेवून श्री.प्रदिपजी मिश्रा यांचा आशीर्वाद घेणार आहे.