
बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण;
अमरावतीत 6 तर, अकोल्यात 11 जणांविरुद्ध कारवाईचा बडगा
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१८अमरावती
अमरावती जिल्ह्यातील बांगलादेशी रोहिग्यांना बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. अमरावती शहरात सुद्धा बनावट जन्म दाखला दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. यात खोटे कागदपत्र सादर केल्या प्रकरणी अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. जन्म दाखल्यासाठी खोटे कागदपत्र देऊन प्रशासनाची फसवणूक केल्या प्रकरणी 6 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनमध्ये 8 लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता पुन्हा 6 जणांवर कारवाई केल्याने या प्रकरणात अमरावती जिल्ह्यात आरोपींची संख्या 14 वर गेली आहे. सोमय्या यांनी आज अमरावती तहसील कार्यालयातील भेट दिली व उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्या सोबत चर्चा केली.
अकोल्यात 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल
दुसरीकडे अकोल्यात ही बनावट जन्म दाखल्या प्रकरणी आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. जन्म दाखल्यासाठीबनावट कागदपत्रे दिल्याचे तपासात उघड झाले आहे. अकोल्यातील रामदासपेठ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याआधी 3 फेब्रुवारीला बनावट कागदपत्र प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर आता नव्याने कारवाई केल्यामुळे अकोला पोलिसात आतापर्यंत एकूण 24 लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे. अकोला जिल्ह्यात बनावट कागदपत्र बनवून जवळपास 80 बांगलादेशी नागरिकांनी नागरिकत्व घेतल्याची शंका ही या निमित्याने व्यक्त केली जात आहे.
बांगलादेशी रोहिणग्यांची हकुहळू व्याप्ती वाढत आहे. आता माझं लक्ष अमरावती शहरावर आहे. याठिकाणी 5 हजार लोकं आहे जे इथले असूच शकत नाही. त्यांनी जे 50-70 वर्ष जुने पुरावे दिले ते आतापर्यंत काय करत होते. ज्यांनी जन्म प्रमाणपत्र मिळवले त्यांच्यावर या प्रकरणी कारवाई होईल. फॉरेन्सिक ऑडिटची मागणी मी केलेली आहे. दीड महिन्याच्या मोहिमेत 7 एफआयआर दाखल झालेत. काही दिवसात सरकार ज्यांना जन्म प्रमाणपत्र दिले त्यांचं ही रद्द होईल. तर पुढच्या टप्प्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले ते सांगतील की जन्म कुठला आहे. अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ते अमरावती येथे बोलत होते.