
जिल्हास्तरीय कृषि विकास परिषद व प्रदर्शनी मुळे सायन्सकोर मैदानावर घाणीचे साम्राज्य
ट्रॅक ची झाली दैयनीय अवस्था
विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती येथील सांयन्सकोर मैदान येथे सुरु असलेल्या जिल्हास्तरीय कृषि विकास परिषद व प्रदर्शनी भरविण्यात आली असून या प्रदर्शनीला शेतकरी व नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेल्या खाद्यपदार्थ्यांच्या स्टोल मुळे परिसरात मात्र दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एवढेच नाही तर मैदानावर जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी जे ट्रॅक तयार कऱण्यात आले आहे त्याच ट्रॅकवर पहाटेचा विधी व लघुशंका करण्यात येत आहे.



मुलांना खेळण्यासाठी व जेष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी शहरातील मध्य असे असलेले सायन्सकोर मैदानावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे ढीग साचले आहेत. अत्यंत घाण व दुर्गंधीयुक्त झालेल्या या मैदानाकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का ?असा प्रश्न आता सामान्य नागरिक विचारीत आहेत. या मैदानावर सध्या जिल्हास्तरीय कृषि विकास परिषद व प्रदर्शनी मोठ्या थाटात सुरु आहे. प्रदर्शनीमध्ये एकूण २८८ स्टाॅल लावण्यात आलेले आहेत त्यात काही स्टाॅल हि खाद्य पदार्थ्यांचे आहेत. हे खाद्यपदार्थ संचालक रात्री प्रदर्शनी बंद झाल्यानंतर उरलेले उष्ट अन्न स्टाॅलच्या मागच्या बाजूने असलेल्या ट्रॅकवर फेकून देतात. त्यामुळे त्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे सकाळी जेंव्हा जेष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात सर्वच वयोगटातील स्त्री-पुरुष येथे वॉकिंग करण्यासाठी येतात.तेंव्हा त्यांना या दुर्गंधीचा सामना करावा लागतो त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे


कंटेनरचा काहीच उपयोग नाही
कचरा टाकण्यासाठी कंटेनर या ठिकणी ठेवण्यात आलेले आहेत मात्र कोणीही त्या ठिकाणी कचरा टाकत नाही तर सुलभ सौचालयाची व्यवस्था हि मैदानावर करण्यात आली आहे मात्र त्या हि सुलभ सौचालयात कोणीही जात नाही व मैदानावरच मिळेल त्या ठिकाणी सकाळचा विधी आटोपून प्रदशणी मध्ये व्यवसाय करण्यात तयार राहतात.


आम्ही या ठिकाणी दररोज सकाळी फिरायला येतो मात्र सध्या या मैदानावर जागोजागी कचऱ्याचे ढीग व दुर्गंधी पसरली आह. ट्रॅकवरून फिरतांना प्रचंड दुर्गंधी चा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी या साठी हि प्रदर्शनी या ठिकाणी लावण्यात आली आहे हे उत्तमच मात्र या ठिकाणी असलेल्या खाद्य पदार्थाच्या स्टाॅल संचालकांनी या ठिकाणी घाण करणे हे काही योग्य नाही.
सुधीर कडू [ सामान्य नागरिक ]