
“उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्षही होतील…”, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
विदर्भ प्रजासत्ताक
दि.२८अमरावती :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नाशिक, धाराशीव, परभणी येथील खासदारांनी त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले. उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व पायदळी तुडवले. ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावे लागेल, त्या दिवशी मी माझे शिवसेनेचे दुकान बंद करेन, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. पण, उद्धव ठाकरेंनी स्वत: बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. मतांच्या लांगुनचालनासाठी उद्धव ठाकरेंनी धर्म सोडला, हिंदुत्वाचा विचार सोडला. भगव्या ध्वजाचा विचार सोडला. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य झाले आहेत, पुढच्या काळात ते अध्यक्षही होतील, अशी टीका महसूल मंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.
पहा लाईव्ह विडिओ …..