
विधानसभा निवडणूक प्रकरणी नागपूर खंडपीठात सुनावणी……
आ. राजेश वानखडे आणि आ. प्रकाश भारसाकळे यांना समन्स
विदर्भ प्रजासत्ताक
दि.३अमरावती


विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिगज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला असून त्याविरोधात काहींच्या मनात अद्यापही शंका आहे. तर निवडणूक मॅनेज केल्याची शंका काहींच्या मनात आहे. याच शंकेतून काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि आकोट विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे पराभूत
उमेदवार मनीष गणगणे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. तर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर खंडपीठाने तिवसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश वानखडे आणि आकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांना समन्स बजावले आहेत.
