
शहरासह जिल्ह्यात अर्लट
शनिवारला अमरावती विमानतळ दिवसभर होते बंद…!
ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना सुद्धा नो एन्ट्री
फोन वरील धमकी, सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारी
विदर्भ प्रजासत्ताक
दि.११अमरावती
भारत-पाक दरम्यान युद्धसदृश्य स्थिती एकमेकांवर हवाई हल्ले सुरु असताना देशभरात खबरदारी घेण्यात येत असून सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली आहे. राज्यातील अनेक विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला. अशातच शनिवारला अमरावती विमानतळ सुद्धा बंद ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे विमानतळावर दैनंदिन ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्यांना तसेच कर्मचाऱ्यांना सुद्धा आतमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. उल्लेखनीय महणजे शनिवारला अमरावती विमानतळावरून
विमान उड्डाण नव्हते.
दरम्यान, शनिवारलाच पाकिस्तान आर्मीतून बोलत असल्याची बतावणी क रून बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा व्हॉटस् अॅप कॉल अमरावती एमआयडीसीतील कामगाराला आला. त्यानंतर पोलिसांनी अमरावती शहरासह जिल्ह्यात हायअलर्ट घोषित केला . यानंतर अमरावती विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली. त्यामुळे रविवारला विमानतळ सुरु राहणार की नाही, याबाबत रात्री उशिरापर्यंत निर्णय झाल नव्हता. अमरावती विमानतळावरू सोमवार, बुधवार आणि शुक्रवारला अमरावती मुंबई विमानाची ये-जा एक फेरी असते.