जिल्ह्यात हजारो ठिकाणी हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा
चांगपूरात भक्तांसाठी हजारो पोळ्या,डाळ-भात,बूंदीचा महाप्रसाद
दि.६वि.प्रजासत्ताक चांगापूर
अमरावती नजीकच्या चांगापुरमध्ये हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे साडेतीन वाजल्यापासून पंचामृत अभिषेक, मंत्रोच्चार, हनुमान चालीसा पठण, महाआरती आली. मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादही ठेवण्यात आला होता भाविकाला महाप्रसाद मिळावा यासाठी काल रात्री पासूनच स्वयंपाकाची तयारी सुरू होती. हजारो पोळ्या,डाळ-भात,बूंदीचा महाप्रसाद भक्तांसाठी ठेवण्यात आला. पहाटे सहा वाजल्यापासूनच महाप्रसाद सुरु करण्यात आला आहे. हजारोंच्या संख्येनं भाविक आज हनुमान मंदिरात दर्शनासाठी येत आहेत.
चांगापूर येथील स्वयंभू हनुमान मंदिरात वर्षाच्या 365 ही दिवस रोज पहाटे चार वाजता अभिषेक केला जातो. अभिषेक केल्यावर हनुमानाची आरती होते आणि सकाळी सहा वाजता हनुमानाला नैवेद्य दिला जातो. जागृत देवस्थान असणाऱ्या या मंदिरात हा नित्यक्रम गत अनेक वर्षांपासून सुरू आहे.चांगापूर येथे फार पूर्वी गाव होते मात्र कालांतराने हे गाव उठून गेले. मात्र, या ठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली स्वयंभू हनुमान मूर्ती मात्र कायम राहिली. लगतच्या वलगाव या गावातील श्री वल्लभ बद्रीनाथ लढ्ढा यांच्या स्वप्नात सांगापुर येथील हनुमान ताने दृष्टांत दिल्यावर त्यांनी 1935 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला. नवसाला पावणारा हा हनुमान अशी मान्यता असून अमरावती शहरासह जिल्ह्यातील अनेक गावातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.
हनुमान जयंतीच्या पर्वावर आज पहाटे तीन वाजल्यापासून चांगापूर येथील हनुमान मंदिरात श्री हनुमान आला अभिषेक चढविण्यास सुरुवात झाली. दूध, दही, मध, पाणी, साखर अशा पंचामृतासह श्री हनुमंताला अभिषेक चढविण्यात आला. साडेचार वाजता हनुमान चालीसा पठण आणि पाच वाजता हनुमानाची आरती मंदिरात करण्यात आली. अभिषेक सोहळा आणि आरतीला पाचशेच्यावर भाविक मंदिरात पोहोचले होते.