सहकार पॅनल चा दर्यापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती प्रचाराचा शेकडो मतदारांच्या उपस्थितीत शुभारंभ
शिंगणापूर काळा मारुती येथून फुटला प्रचाराचा नारळ
दि.11वि.प्रजासत्ताक दर्यापूर
दि.11वि.प्रजासत्ताक दर्यापूर
कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूर चे निवडणूक जशी जशी जवळ येते तशी तशी पावसाच्या दिवसात सुद्धा वातावरण तापायला लागले काँग्रेस समर्पित सहकार पॅनल चा शेकडो मतदारांच्या उपस्थितीत रोज सोमवार सकाळी 10 वाजता काळा मारोती संस्थान शिंगापूर येथे दर्यापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रचाराचा नारळ शुभारंभ करण्यात आला सर्वप्रथम आ. बळवंत वानखडे(दर्यापूर,अंजनगाव विधानसभा मतदार संघ,सुधाकर पाटील भारसाकळे(तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी दर्यापूर तथा अध्यक्ष जिल्हामध्यवर्ती बँक अमरावती) ऍड श्रीरंग पाटील अरबट संजू भाऊ बेलोकार ऍड अभिजीत देवके विक्रम सिंग परिहार सहकार पॅनल सर्व नेते व उमेदवार आदींच्या उपस्थितीत काळाराम मंदिर येथे जाऊन सर्वांनी दर्शन घेतले व त्यानंतर विविध नेते उमेदवार आदींच्या हस्ते नारळ फोडण्यात आली व त्यानंतर सर्व उमेदवारांचा नेते सुधाकर पाटील भारसाकडे यांनी व्यक्तिगत परिचय करून दिला सर्व प्रत्येक उमेदवारांनी व्यासपीठावर येत मतदारांना हात जोडून नमस्कार केला व त्यानंतर पॅनलच्या प्रमुख नेत्यांनी मनोगत व्यक्त केले प्रचार नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बळवंत वानखडे यांनी भूषवले होते
काळा मारुती संस्थान ची सभागृह ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी सेवा सहकारी सोसायटी पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीने सभागृह पूर्णता भरून गेले होते जिथे जागा मिळेल तिथे बसण्याची मतदारांची तयारी होती त्याच कार्यक्रमात स्वर्गीय बाबासाहेब सांगदूधकर गृहनिर्माण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांचा प्रदीप बापू देशमुख संस्थेचे विश्वस्त यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला कांचन मला पाटील गावंडे यांनी जे झालं ते चांगलं झालं नावाला लागलेला कलंक पुसण्याकरिता सुधाकर पाटील भारसाकडे यांची मतदारांनी निवड केली असल्याचे म्हटले यावेळी आपल्या मार्गदर्शन पर भाषणामध्ये सुधाकर पाटील भारसाकळे यांनी बाजार समितीमध्ये आजपर्यंत झालेल्या कारभाराचा सप्रमाण समाचार घेतला मग यामध्ये सभापती महोदयांचा एकतर्फी कारभार असो किंवा त्यांच्याच संचालकांचा त्यांना विरोध असो पण विकास कामाच्या बाबतीत आम्ही नेहमी सहकार्य करत आलो त्यामुळेच आज ही कामे दिसतात उगाच त्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे प्रतिपादन सुद्धा केले व सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना एकही मत वाया न जाऊ देता प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. या सभेमध्ये सहकार नेते एडवोकेट श्रीरंग पाटील अरबट बाळासाहेब हिंगणीकर यांनी सुद्धा आपली मनोगते व्यक्त केली. शेवटी झालेल्या अध्यक्ष भाषणांमध्ये लोकप्रिय आमदार बळवंतराव जी वानखेडे यांनी समोरच्या पॅनल चा समाचार घेत व आपल्या कारकीर्दीत झालेल्या विकास कामाचा आढावा घेत उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांना आपले नातेसंबंध हितसंबंध बाजूला ठेवून एकही मत क्रॉस वोटिंग न करता सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे भावनिक आव्हान केले. या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व सुंदर असे संचालन खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष एडवोकेट अभिजीत देवके यांनी तर आभार प्रदर्शन काळा मारुती संस्थांचे अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी केले यानंतर स्नेहभोजनांने कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला.