धामणगाव मतदार संघात दलित वस्त्यात उगवली विकासाची पहाट
चार कोटीचा निधी
आ आमदार प्रताप अडसड यांनी केली वचननाम्याची पूर्तता
मागील अनेक वर्ष विकासापासून वंचित असलेल्या धामणगाव मतदारसंघातील दलित वस्त्यांमध्ये आ प्रताप अडसड यांच्या प्रयत्नाने विकासाची पहाट उगवली असून ५५ गावात चार कोटीच्या निधीला मंजुरात मिळाली आहे.
धामणगाव मतदारसंघ तीन तालुक्यात विस्तारलेला आहे यातील दलित वस्त्यांची संख्या अधिक आहे मात्र या वस्त्या अनेक वर्ष विकासापासून वंचित आहे
मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आमदार प्रताप अडसड यांनी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत
या वस्त्यांमध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवायला सुरुवात केली धामणगाव तालुक्यात १६ ,चांदूर रेल्वे २७ तर नांदगाव खंडेश्वर १२ अश्या ५५ गावासाठी ४ कोटीच्या निधीला मंजुरी मिळवून आणली यातील पहिला हप्ता प्राप्त झाला आहे या निधीत दलित वस्त्यांमध्ये सिमेंट रस्ता ,नाली,गावातील बौद्ध विहार ,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौंदर्यीकरण समाज भवन ,शेड बांधकाम संरक्षण भिंत अशी विविध विकासात्मक कामे होणार आहे या सोबतच आमदार प्रताप अडसड यांनी आपल्या स्थानिक विकास निधी मधून अर्ध्या कोटींचा दलित वस्त्यांमध्ये निधी दिला आहे . दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावात संविधान भवन व दलित वस्त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाकडे निधीची मागणी केली आहे निवडणुकी दरम्यान दिलेला शब्द आ प्रताप अडसड यांनी पाळला व दलित वस्त्यांच्या विकासाकरिता मतदारसंघात भरीव निधी आणल्याबद्दल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जळगाव आर्वी येथील नवयुवक बौद्ध मंडळाने आमदार प्रताप अडसड यांचा सत्कार केला यावेळी सरपंच सत्यभामा कांबळे, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजीव भोगे, माजी सरपंच धीरज मुडे, प्रभाकर बुरघाटे, ग्रा प सदस्य कल्पना गायकवाड सुवर्णा नेवारे पंडित कांबळे अनिता गोडाणे,शोभा बोरकर, अमृत गोडाणे आकाश रंगारी, प्रफुल कांबळे ,आशिष बोरकर, तेजस गोडाणे विकास गजबे यांच्या सह असंख्य भीम सैनिकांची उपस्थिती होती.