आत्मनिर्भरतेसाठी मुलाखतपुर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
श्री रामचंद्र युवक कल्याण संस्था व यशोमती ठाकूर मित्र मंडळाचा उपक्रम
तिवसा
ग्रामीण भागातील अनेक प्रतिभासंपन्न युवक-युवतींकडे पदवी आहे, कौशल्यही आहे पण त्यांना रोजगार मिळविण्याबाबत ते कमी पडतात. त्या पार्श्वभूमीवर त्यांना मुलाखतपूर्व प्रशिक्षण शिबीराचा उपक्रमाचा आरंभ करण्यात आला असून आज 16 एप्रिल रोजी तिवसा येथे या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी उच्च विद्या विभूषित आहेत. त्यांची परिश्रम करण्याची तयारी सुद्धा आहे मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ते रोजगार मिळविण्यात मागे पडतात. हा कळीचा मुद्दा हेरुन श्रीरामचंद्र युवक कल्याण संस्था मोझरी व आमदार यशोमती ठाकूर मित्र मंडळाच्या वतीने मुलाखतपूर्व प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्याचा सामाजिक उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा प्रारंभ आज 16 एप्रिल रोजी तिवसा येथून करण्यात आला. या शिबीरात मुलाखती दरम्यान कसे प्रश्न विचारले जातात, त्यासाठी नेमकी तयारी करावी कशी आदी विषयांबाबत उपस्थित युवक-युवतींना संबंधित तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले. तिवसा येथे आयोजित केलेल्या या शिबीराला ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषकरुन युवतींची संख्या सुद्धा लक्षणीय होती.
@ विदर्भ प्रजासत्ताक