चांदूरबाजार-मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर मास व लाकूड विक्रेते आले रस्त्यावर
अपघातांचे वाढले प्रमाण, नागरिकांच्या जीविताला धोका
करण खंडारे – चांदूर बाजार
अवैधपणे अतिक्रमण करणाऱ्यांचा मनमानी कारभार चांदूर बाजार-मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर सुरू आहे चांदूर बाजार शहरात गेल्या काही वर्षांपूर्वी बस स्थानकाच्या मागे नगरपालिकेच्या मालकी हक्काच्या जागेमध्ये मास विक्रेत्यांची विक्री सुरु होती दरम्यान अनधिकृत जागेवर मास विक्री करत असल्यामुळे मास विक्रेत्यांना मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर स्थलांतर करण्यात आले क्रीडा संकुला जवळ जमिनीवरच काही मास विक्रेत्यांनी अतिक्रमण केले तर लाकूड विक्रेत्यांनी नगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अग्निशामक इमारतीसमोर अनधिकृत जमिनीवर लाकूड विक्री करत असल्यास चे चित्र दिसते तरी सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त नागरिकांकडून करण्यात येत आहे विशेष म्हणजे या अतिक्रमणामुळे अस्वच्छ तादुर्गंधीला या भागातील क्रीडा संकुला मध्ये येणाऱ्या नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे मास विक्रेते व लाकूड विक्रेत्यांनी अड्डा बनवून रस्त्यावर आल्यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे गेल्या काही दिवसांमध्ये काही वाहन चालकांना अपघाताचा सामना करावा लागला तर काही, वाहनचालकांचा अपघातामुळे बळी झाला त्यामुळे रोज राष्ट्रीय महामार्गावर अनुचित प्रकार घडते काही मास विक्रेते व लाकूड विक्रेते विद्युत तारांवर दुकानांचे तार टाकून विद्युत पुरवठा घेत आहे त्यामुळे शॉर्ट लागण्याची भीती निर्माण झाली आहे याकडे गांभीर्याने चांदूर बाजार ठाणेदार अशोक जाधव व स्थानिक प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

*अपघातांचे वाढले प्रमाण*
चांदूर बाजार-मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून मास व लाकूड विक्रेत्यांनी रस्त्यावर येऊन अनधिकृत अतिक्रमण करून मास-लाकूड विक्री करत असल्यामुळे चालकांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले काही दिवसा अगोदर ट्रॅक्टर चालक युवकाचा ट्रॅक्टर पलटी होऊन अपघातामुळे बळी झाला होता अशी अनुचित घटना घडू नये या साठी ठाणेदार अशोक जाधव व स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी!
@ विदर्भ प्रजासत्ताक