कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केल्या अभ्यास मंडळावर अपात्र व्यक्तीच्या नियुक्त्या
दि18 वि.प्रजासत्ताक अमरावती
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केल्या अभ्यास मंडळावर अपात्र व्यक्तीच्या नियुक्त्या केल्या.
12 एप्रिल 2023 रोजी विद्यापीठाद्वारे काढलेले एक्स्ट्रा ऑडिनरी नोटिफिकेशन नंबर 57/2023 नुसार
विविध अभ्यास मंडळावर नामनिर्देशित करण्याकरिता लागणारी आवश्यक पात्रता नसलेल्या अध्यापकांना नामनिर्देशित केले आहे.
एक्स्ट्रा ऑडिनरी नोटिफिकेशन काढून विविध विद्याशाखेतील विविध अभ्यास मंडळावर पब्लिक युनव्हर्सिटी ऍक्ट
2016 मधील सेक्शन 40(2) (b)(i),40(2) (b)(ii) या कलमांचा वापर करून आपण सहा अध्यापकांना नामनिर्देशित केले. त्यापैकी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 नुसार पदव्युत्तर अध्यापकांमधून दोन अध्यापकांना नियुक्त करणे अपेक्षित होते परंतु राज्यशास्त्र , समाजशास्त्र, इतिहास ,इंग्रजी या विषयांमध्ये नामनिर्देश करण्याकरिता लागणारे आवश्यक पात्रता नसताना सुद्धा अध्यापकांची वर्णी लागलेली आहे. अशा अपात्र प्राध्यापकांची यादी मधील समावेश डॉ.प्रमोद येवले यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील मान्यताप्राप्त विभाग प्रमुख नसलेल्या तीन अध्यापक नामनिर्देशन करताना सुद्धा ‘कॉमर्स अँड मॅनेजमेंट ‘ या विद्याशाखेमध्ये सुद्धा ज्या अध्यापकांनी विभाग प्रमुख म्हणून मतदान केलेलं आहेत. त्याच अध्यापकांना दुसऱ्या अभ्यास मंडळामध्ये विभाग प्रमुख नसलेल्या प्रवर्गातून नऊ अध्यापकांच्या नियुक्त केलेल आहेत.
विशेषतः ज्या सलग्नित महाविद्यालयामध्ये संबंधित विषयातील पदवीधर अभ्यासक्रम आहेत व त्या विषयांना शिकविणारे मान्यताप्राप्त पदव्युत्तर अध्यापक आहे अशी सलग्नित महाविद्यालयामधील दोन मान्यता प्राप्त पदव्युत्तर अध्यापकांचे नामनिर्देशन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संबंधित विद्याशाखेच्या अधिष्ठात्याशी विचार विनिमय करणे अपेक्षित होते. परंतु दुर्दैवाने असे झालेले दिसत नाही.
अशाच प्रकारच्या चुकीच्या नियुक्ती 2019 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले होत्या. त्यावर
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढलेला असून ज्या महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्या जाते. त्याच महाविद्यालयातील शिक्षकांना नामनिर्देशित करता येईल असा स्पष्ट निवाळा दिला आहे.
असं असताना सुद्धा महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय असून सुद्धा अपात्र चुकीच्या अध्यापकांच्या नियुक्ती करून स्वतःची हुकूमशाही निर्माण करण्याचा प्रयत्न संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये कुलगुरू डॉ. प्रमोद येवले करत आहे.
डॉ. प्रमोद येवले यांनी अपात्र अध्यापकांच्या नियुक्ती रद्द केल्या पाहिजे. यासाठी डॉ.प्रशांत विघे सिनेट सदस्य, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांनी 13 एप्रिल 2023 रोजी तक्रार दिलेली होती
आज युवक कॉग्रेंस च्या वतिने पुन्हा या बाबद स्मरण पत्र डॉ.प्रसाद वाडेगावकर प्र- कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांना देन्यात आले व तात्काळ अपात्र अध्यापकांच्या नियुक्ती मागे घेण्यात याव्यात अशी मागनी करण्यात आली आहे.
जर अपात्र व्यक्तींच्या नियुक्त मागे घेण्यात आल्या नाही तर आंदोलन करण्यात येईल असा सुद्धा इशारा देण्यात आला.
@विदर्भ प्रजासत्ताक