पाणी पुरी,आईसगोला खाताय;एकदा विचार कराच !!
दि13वि.प्रजासत्ताक अमरावती
दूषित अन्न व पाण्यामुळे होणारा ‘टायफाइड’ म्हणजे विषमज्वराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. १०० रुग्णांमध्ये जवळपास ८ ते १० रुग्ण या आजाराचे आढळून येत आहेत. यामुळे बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी विशेषतः पाणीपुरी, कुल्फी, बर्फाचा गोळा खाताना एकदा विचार करा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. शाळांना उन्हाळी सुट्टया लागताच चौकाचौकांत विविध खाद्यपदार्थाच्या हातठेल्यांची गर्दी होऊ लागली आहे. उन्हाळ्यात सायंकाळच्या वेळी बाहेरचे चटपटीत खाण्यावर अनेकांचा जोर असतो. परंतु काही ठिकाणी स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात नसल्याने टायफाइडसारखे आजार बळावत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे पाणी पुरी खायचीच असेल तर चांगल्या पाणीपुरी स्टोल वर जा व मनसोक्त पाणी पुरी खा ..
पाणीपुरीतून पसरतोय आजार
पाणीपुरीसाठी वापरल्या जाणाया पाण्याच्या शुद्धतेकडे फारसे लक्ष दिले जात नाही. दुसरे म्हणजे, पाणीपुरीवाला वारवार हात त्यात बुचकळत असतो. त्याच्या हाताची व नखातील घाण त्यात मिसळत असते. यामुळे गॅस्ट्रो होण्याची शक्यता असते.
तर काहीना टायफाइड होतो.
आजाराची लक्षणे
‘साल्मोनेला टायफी नावाचा हा विषाणु टायफाइडसाठी कारणीभूत ठरतो. या रोगाच्या पहिल्या आठवड्यात शरीराचे तापमान हळूहळू वाढते. सोबतच डोकेदुखी, अंगदुखी. पोट दुखणे, पोटात मुरडा येणे, अस्वस्थता वाटते. काहीना उलट्यांचाही त्रास होतो. हगवण लागण्याचा वासही होऊ शकतो.
प्लेटलेट्स कमी होतात
डॉक्टरांनुसार या आजाराचे निदान करताना रक्ताची चाचणी म्हणजे ‘विडाल टेस्ट’ पहिल्या आठवड्यात ‘निगेटिव्ह येते. परंतु रोगाच्या दुसऱ्या आठवड्यात ताप वाढतो आणि १०४ डिग्रीपर्यंत पोहोचतो. रुग्ण बेशुद्ध अवस्थेतही जाऊ शकतो. याच टप्प्यात करण्यात येणाऱ्या ‘विडाल टेस्टमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येतो. रोगाच्या तिसया आठवड्यात अनेक गुंतागुंत वाढते. यात विष्ठेतून रक्त येणे, न्यूमोनिया, पाण्याची मात्रा कमी होते. काही रुग्णांच्या शरीरावर पुरळही येतात. याच टप्प्यात रुग्णाचे प्लेटलेट कमी होतात. यामुळे सुरुवातीलाच | डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचा ठरतो.