*विद्यार्थ्यांमध्ये रमणारे शिक्षक वसंत तेलखडे यांच्या सेवापूर्ती सोहळा संपन्न
सत्कार करतेवेळी संपूर्ण सभागृहामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते.
भातकुली -:
पंचायत समिती भातकुली अंतर्गत जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा अळनगांव येथील ज्येष्ठ शिक्षक वसंत तेलखडे हे नियमित सेवा निवृत्त झाले.त्यांची शाळेत विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती. जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळेत जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे शिक्षक वसंत तेलखडे त्यांच्या ३१ ॲक्टोंबर रोजी सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आला होता .या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विजय मानकर तर प्रमुख अतिथी म्हणून गावातील सरपंच गौतम खंडारे,दीपक कोकतरे गटशिक्षणाधिकारी
नरेंद्र गायकवाड अधीक्षक शापोआ, सूनील पांडे,उमेश चूनकीकर,अशोक तेलखडे,रामेश्वर सनके,राजेंद्र सनके,कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथीच्या हस्ते सेवानिवृत्त शिक्षक वसंत तेलखडे यांचा सहपत्नी शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक वसंत तेलखडे यांना व विद्यार्थि यांना अश्रू अनावर झाले होते. शाळेतील विद्यार्थ्यांसोबत व सहकाऱ्यांशी नेहमी हसत खेळत असणारे, मितभाषी असणारे कायम विद्यार्थ्यांमध्ये रमलेले पाहायला मिळत असे. या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थि खूप भावनिक झाली होती.अगदी यावेळी संपूर्ण सभागृहामध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले होते. सत्कारमूर्ती यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना वही पेन पेन्सिल व खाऊचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कावलकर सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रवीण शेंद्रे सर यांनी केले.
प्रतीनिधी धनराज खर्चान भातकूली