*मोर्शी तालुक्यातील काटपुर( ममदापुर) येथे वेंकटचलपती श्रीनिवास भगवान बालाजीची आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते आरती……*
*भाविकभक्तांच्या इच्छित मनोकामना पूर्तीसाठी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी केली विश्वमांगल्याची प्रार्थना……..*
*श्री व्यंकटेश बालाजी भगवान शरद पौर्णिमा माळी उत्सवात भाविकभक्तांची मांदियाळी…..*
*भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटपूर( ममदापुर)स्थित श्री बालाजी संस्थान येथे व्यंकटरमना गोविंदा-श्रीनिवासा गोविंदाचा एकच जयघोष……
मोर्शी प्रतिनिधी
भगवान व्यंकटेश यांना गोविंदा, श्रीनिवास, वेंकट आदी नावांनी ओळखल्या जाते. आंध्रप्रदेश येथील तिरुमला पर्वत रांगेत असलेल्या भगवान वेंकटेश्वर हे विष्णूचा अवतार असून तिरुपती मंदिराची प्रमुख देवता आहे असे मानले जाते.यासोबतच असे मानले जाते की देवता स्वयंभू ( स्वतः प्रकट आहे).या देवतेकडे त्रिमूर्तीची शक्ती आहे. ब्रम्हा, विष्णू आणि शिव काही पंथाचा असा विश्वास आहे की वेंकटेश्वराकडे शक्ती आणि स्कंदची शक्ती आहे. इच्छित मनोकामना पूर्तीसाठी अनेकांनी श्री व्यंकटेश स्तोत्राचा अनुभव घेतला आहे. तिरुपतीला भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखले जाते. अर्थातच पृथ्वीवरील विष्णूचे निवासस्थान.तिरु म्हणजे लक्ष्मी,लक्ष्मीचा पती म्हणजे तिरुपती. भगवान वेंकटेश्वर किंवा बालाजी हे भगवान विष्णूचे अवतार आहे.भगवान वेंकटेश्वर साक्षात मंदिरातील गर्भगृहात विराजमान आहेत. आपल्या भक्तांच्या मनापासून इच्छा पूर्ण करणारा सर्वात शक्तिशाली परमेश्वर म्हणून त्याची मान्यता आहे. भगवान वेंकटेश्वर हे वेंकटचलपती श्रीनिवास म्हणूनही ओळखले जातात. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील काटपुर( ममदापुर) स्थित श्री बालाजी संस्थान येथे ब्रम्होत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिनांक २५ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२३ दरम्यान देवालय परिसरात विविध प्रकारच्या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांच आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तिर्थस्थापना, भजनमाला,शयन आरती व प्रसाद,श्री व्यंकटेश स्तोत्र पठण, श्री व्यंकटेश प्रभू-श्रीदेवी-भुदेवीसह गावातून पालखी यात्रा,अभिषेक, ललित कीर्तन आदींसह विविध प्रकारच्या कार्यक्रमात भाविकभक्तांच्या वतीने उत्साहपूर्वक सहभाग नोंदवला जात आहे. मंगळवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार-सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी श्री बालाजी संस्थान येथे भेट दिली. यादरम्यान आ. सौ.सुलभाताई खोडके यांनी श्री व्यंकटेश बालाजी प्रतिमेस वंदन-पूजन-माल्यार्पण करीत भगवान वेंकटेश्वर अर्थातच वेंकटचलपती बालाजी भगवान ,देवी महालक्ष्मी आणि देवी पद्मावती यांचे कृपाशीर्वाद घेतले.तदनंतर आ. सौ. सुलभाताई खोडके व यांच्या हस्ते भगवान बालाजी यांची आरती करण्यात आली. याप्रसंगी श्री बालाजी संस्थानच्या विश्वस्थांनी आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल-श्रीफळ-पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यादरम्यान भगवान बालाजी यांच्या आशीर्वादाने सर्वांचे संकल्प व मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान वेंकटेश्वर यांच्या चरणी नतमस्तक होत आमदार-सौ. सुलभाताई खोडके यांनी यावेळी विश्वमांगल्याची प्रार्थना केली.याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके, यश खोडके,महेंद्र भुतडा,अजय दातेराव,श्री बालाजी संस्थानचे अध्यक्ष-सुभाषचंद्र राठी,सचिव-जुगलकिशोर भट्टड, विश्वस्त-साहेबराव धनसांडे,पुरुषोत्तम राठी आदींसह बहुसंख्येने भावीकभक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.