मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चांदुर बाजार मध्ये शांतता समितीची बैठक
शांतता प्रस्थापित होण्यासाठी सहकार्य करण्याचे ठाणेदार बोंडे यांचे आवाहन
दि.२३ विदर्भ प्रजासत्ताक
चांदुर बाजार
मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षण या पार्श्वभूमीवर चांदुर बाजार पोलीस स्टेशन मध्ये ठाणेदार सुरज बाेंडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक शनिवार रोजी सकाळी संपन्न झाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संपुर्ण राज्या मध्ये गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण व ओबिसी आरक्षण या मुद्यावर वातावरण तापले आहे तर अनेक जिल्ह्यात पोलीस आंदोलकांमध्ये राडा पाहायला मिळाला तर अजूनही जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात आंदोलन केलच जात आहे तर मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही देव जरी खाली आला तरी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही आता मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे सरकारने एकाला अट केली की सर्वांनी तुरुंगात जायचं सरकारने हे गांभीर्याने घेण्याची गरज नाहीतर जड जाईल असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला होता तर एकीकडे चर्चेत असणारे नेते छगन भुजबळ यांच्या अनेक ठिकाणी सभा सुरु असून ओबिसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही या भूमिकेवर ते ठाम आहेत त्याच पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी चांदुर बाजार पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झालाी कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करुन शांतता प्रस्थापित होण्यासाठी यावेळी ठाणेदार सूरज बोंडे यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना जनतेला आव्हान केले तर चांदुर बाज़ार पोलीस स्टेशन हद्दीमधील सर्व पोलीस पाटील यांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी निर्देश देण्यात आले यावेळी सपोउपनि विनोद इंगळे,सह अनेक मान्यवर उपस्थित होते.