कोहाना या गावाला जिल्हाधिकारी यांनी देव भेट देऊन केला शुभारंभ!
दि.१९विदर्भ प्रजासत्ताक
कोहाना
ग्रामस्थांच्या समस्या ऐकण्यासाठी विविध विभागातील अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचारी यांनी प्रत्यक्ष ग्रामस्थांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आणि जाणून पण घेतल्या. त्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले असल्याचे दिसून आले.
एक दिवस मेळघाटासाठी या अंतर्गत आज विविध विभागाचे शंभर अधिकारी आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी यांची पथके मेळघाटातील 100 गावांमध्ये रवाना झाली होती.
यावेळी मेळघाटमध्ये जी पथके रवाना झाली त्यांचे अंगणवाडी सेविकांमार्फत ओवाळणी करून आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले ज्यामुळे त्यांच्या मध्ये एक वेगळी ऊर्जा संचारली होती?
यावेळी चिखलदरा तालुक्यातील कोहना या गावात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके त्याचबरोबर जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी गावातील विविध कामाची पाहणी करताना जिल्हाधिकारी यांनी अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील आहाराविषयी चौकशी केली. त्याचबरोबर आरोग्य तपासणी विषयी सुद्धा सखोल माहिती घेतली. तर यावेळी जिल्हाधिकारी यांनी रेशन दुकानाला भेटी देऊन त्यांची सुद्धा चौकशी केली.
यावेळेस कोहना या गावातील अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते त्यांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या आणि समस्या सोडवण्यासाठी विनंती केली.
त्याचबरोबर मेळघाटातील शंभर गावात गेलेली पथक सुद्धा आज येथील गावात पोहोचली.त्यांनी विविध ठिकाणी त्यांना दिलेल्या फॉर्म मधील नमुनानुसार भेटी देण्यास सुरुवात केली आणि गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत यामुळे त्यांच्याकडून चांगल्या स्वरूपात अहवाल मिळून त्यांचा नंतर विभागनिहाय प्लॅन तयार करून पुन्हा फॉलोअप घेण्यासाठी पुरेसा होईल असे जिल्हाधिकारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
एक दिवस मेळघाटासाठी या उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी सौरभ कट्यार यांनी धारणी तालुक्यातील अनेक गावांना भेट दिल्या तर संजीता मोहपात्रा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी चिखलदरा तालुक्यातील गावांना भेटी दिल्या.यावेळी सुद्धा त्यांच्या बऱ्याच समस्या निदर्शनास आलेल्या आल्या.
एक दिवस मेळघाटासाठी हा एक वेगळा आणि स्तुत्य असा उपक्रम असून यामधून निश्चितच चांगल्या बाबी पुढे येतील आणि त्या बाबीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला मेळघाटा मधील समस्या सोडवण्यासाठी उपाय योजना करताना मोठ्या प्रमाणात मदत होईल”
सौरभ कटियार , जिल्हाधिकारी