“शिक्षण सप्ताह” साजरा होणार
२२ ते २८ जुलै, २०२४ ला आयोजन
शिक्षण विभागाचा नविन उपक्रम
दि.१९विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त दिनांक २२ ते २८ जुलै, २०२४ या कालावधीत “शिक्षण सप्ताह” साजरा करणेबाबत शिक्षण संचालक शरद गोरावी यांनी सर्व शिक्षणाधिकारी यांना कळविण्यात आले आहे. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे. हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी, शिक्षक, धोरणकर्ते व भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे.अमरावती जिल्हातील शाळांन मध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहीती अमरावती जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बुध्दभूषण सोनोने,शिक्षण विस्तार अधिकारी प्रविण खांडेकर यांनी दिली आहे.
शिक्षण सप्ताहामध्ये खालील प्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत संदर्भाधीन पत्रान्वये सूचित करण्यात आलेले आहे.
सोमवार,दि.२२/०७/२०२४अध्ययन अध्यापन साहित्य दिवस (TLM Day) (Annexure-1)
मंगळवार, दि. २३/०७/२०२४मुलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस (FLN Day) (Annexure-2)
बुधवार, दि. २४/०७/२०२४
क्रीडा दिवस (Sports Day) (Annexure-3)
गुरुवार, दि. २५/०७/२०२४सांस्कृतिक दिवस (Cultural Day) (Annexure-4)
शुक्रवार, दि. २६/०७/२०२४कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस (Skilling and Digital Initiatives Day) (Annexure-5a and 5b)शनिवार, दि. २७/०७/२०२४मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात एको क्लब उपक्रम/शालेय पोषण दिवस (Eco clubs for Mission Life/ School Nutrition Day) (Annexure-6)
रविवार, दि. २८/०७/२०२४समुदाय सहभाग दिवस (Community Involvement Day (Annexure-7)
या प्रमाणे शिक्षण सप्ताह हा अंगणवाडी केंद्रामध्ये देखील राबविणेबाबत सूचित केले आहे. त्याअनुषंगाने शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिला व बालविकास विभागाशी संपर्क व समन्वय ठेऊन योजनेची अंगणवाडी केंद्रामध्ये यशस्वीरीत्या अंमलबजावणी होईल याची दक्षता घ्यावी. राज्यामध्ये शिक्षण सप्ताहाची यशस्वीरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या स्तरावरून सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व मंडळाच्या, सर्व माध्यमांच्या शाळांना सूचना देण्यात याव्यात.अशा आदेश
शरद गोसावी शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय,पुणे यांनी दिले आहे.