अप्परवर्धा धरणाची तीन दारे 20 सेमी नी उघडली
९४ घन सेंटीमीटर एवढा पाण्याचा विसर्ग सुरू
विदर्भ प्रजासत्ताक
दि.5 अमरावती
ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारपासून सुरू असलेल्या संततधर पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नदीचे पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता बघता व अपेक्षित पर्जन्यमानाचा विचार करता जलाशय प्रचलन सूचीप्रमाणे आज शनिवार५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता ऊर्ध्व वर्धा धरणाची १३ पैकी तीन वक्रद्वारे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून त्यामधून ९४ घन सेंटीमीटर एवढा पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
वर्धा नदी काठावरच्या गावातील ग्रामस्थांना तसेच मासेमाऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून याबाबत ऊर्ध्व वर्धा धरण विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर यांना एक पत्र देण्यात आले आहे.
ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करणार आहे. धरणाची जलपातळी जुलै अखेरपर्यंत ७४ टक्केच्या खाली होती मात्र आता ४ ऑगस्टला पाण्याच्या साठ्याची टक्केवारी ७७.२ एवढी झाल्याने धरणाची दारे उघडण्याची वेळ आलेली आहे.
ऊर्ध्व वर्धा धरणाची निर्धारित पाण्याची पातळी ३४२.५० मिलिमीटर एवढी ठेवण्यात आली असून सध्या ही पातळी ३४०.९७ मिलिमीटर झाली आहे. जवळपास ७७.२ टक्के धरण भरलेले आहे. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. मध्यप्रदेशातून वाहत येणारी जामनदी व माडु नदी तुडुंब भरून वाहत असल्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातच धरणाची तीन दारे उघडण्याची वेळ आलेली आहे.