वझ्झर मॉडेल देशभरात लागू करणार – अभ्यासाकरिता चमू झाली दाखल
खा. डॉ. अनिल बोंडे यांच्या प्रयत्नाला यश…..
अमरावती
खा. डॉ. अनिल बोंडे यांनी पद्मश्री श्री शंकरबाबा पापडकर यांच्या वझ्झर मॉडेल संपुर्ण देशभर बेवारस, बेसहारा, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता अपंग मुलांकरिता लागू करण्यात यावे, आणि त्याद्वारे त्या मुलांचा शोषण होणार नाही असा प्रस्ताव स्पेशल मेन्शनमध्ये राज्यसभेमध्ये मांडला होता. त्याचे अनेक खासदार यांनी अनुमोदन केलेले होते. या स्पेशन मेन्शन मध्ये बाबींची केंद्र शासनाने दखल घेवुन अचलपुर येथील वझ्झर येथे केंद्रशासनाच्या सामाजिक न्याय विभागाची चमू पाठविली आणि अभ्यास करण्याकरिता त्यांनी कार्यवाही सुरु केली. पद्मश्री श्री शंकरबाबा पापडकर यांनी या वझ्झर मॉडेल च्या संदर्भात सर्व तज्ञ चमूला मार्गदर्शन केले, माहीती दिली, मुलांच्या भेटी करुन दिल्या आणि वझ्झर मध्ये ज्या पध्दतीने काम चालते आहे. त्याप्रामणे गतीमंद, मतीमंद, बेसहारा, मुलांच जीवन सुरक्षित व सुखमय झालेले आहे, ते त्यांना दाखवुन देण्यात आले.
पद्मश्री श्री शंकरबाबा पापडकर यांच्या विशेष कार्याकरिता मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सम्मान दिला व राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते श्री शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या बोलतांना श्री शंकरबाबा पापडकर यांनी इच्छा प्रकट केली होती, त्याप्रमाणे बेवारस आणि गतीमंद, मतीमंद मुलांना ज्याप्रमाणे वझ्झर ला सेवा देण्यात येत आहे. त्याप्रमाणे इतरत्र संपुर्ण भारतामध्ये सेवा देण्यात यावी व सुरक्षित ठेवण्यात यावे. त्यासोबतच राज्यसभेच्या अधिवेशानामध्ये डॉ. अनिल बोंडे यांनी स्पेशल मेन्शनमध्ये हा मुद्दा उपस्थित करुन संपुर्ण केंद्र शासनाचे लक्ष वेधले आणि त्याचा परिणाम म्हणून केंद्र शासनाचे मंत्री श्री विरेंद्र कुमार यांनी आपले सचिव स्तरावरचे अधिकारी पाठवले आणि एका महिन्याच्या आत ते अहवाल सादर करणार आहे. यापासून अपेक्षा वर्तविल्या जाते आहे की , वझ्झर मॉडेल मध्ये ज्याप्रमाणे बेवारस, बेसहारा, गतीमंद, मतीमंद मुलांना सहारा दिल्या जातो, त्यांचे संरक्षण केल्या जाते, त्यांच पालन-पोषण केल्या जाते, त्यांना नाव सुध्दा दिल्या जाते. त्याप्रमाणे संपुर्ण भारतामध्ये वझ्झर चे मॉडेल विकसित करुन या सर्व एक लाख मुलांचे संरक्षण केल्या जावं आणि याला मान्यता मिळवुन नविन कायद्यामध्ये रुपांतर निश्चितपणे केल्या जाणार आहे असा विश्वास डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केलेला आहे.
ताज्या बातम्यांचे अपडेट सर्वात प्रथम वाचा आमच्या सोबत @विदर्भ प्रजासत्ताक