आरक्षण रद्द चा विचार करू
राहुल गांधी यांचे विधान
भारत हे सामाजिकदृष्ट्या अनुकूल ठिकाण बनल्यावर काँग्रेस पक्ष आरक्षण संपविण्याचा विचार करेल,” असे विधान राहुल गांधी यांनी आज अमेरिका दौऱ्यादरम्यान केले. वॉशिंग्टनमधील जॉर्ज टाउन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी ते संवाद साधत होते. त्यांनी जातीनिहाय जनगणनेची आवश्यकता असल्याचा मुद्दाही या वेळी मांडला.
राहुल गांधी म्हणाले, “देशातील १० टक्के लोकसंख्या असलेल्या दलित, ओबीसी आणि आदिवासी समुदायांना योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. भारतातील मोठ्या संस्था, व्यवसाय, प्रसार माध्यमे यांचे नेतृत्व करण्याचा मुद्दा येतो, तेव्हा या समुदायांचा विचारही होत नाही. या सर्वांचा सहभाग तपासण्यासाठी जातीनिहाय जनगणना आवश्यक आहे. देशातील प्रमुख उद्योगांमध्ये, माध्यमामध्ये आणि न्यायालयांत उच्य पदांवर मागासवर्गातील कोणीतरी
क्वचितच असतो. सामाजिक आर्थिक सर्वेक्षणात या वर्गाच्या स्थितीचा अंदाज येतो. मात्र, आपण भारतातील माध्यमे, आरोग्य क्षेत्र, शिक्षण यामधील उद्योगांच्या मालकीचा विचार करणे आवश्यक आहे. देशातील १० टक्के लोकसंख्येकडे १० टक्क्यपिक्षा कमी पैसा आहे.” “सामाजिक स्थितीच्या बाबतीत भारत हे अनुकूल ठिकाण बनल्यावर आम्ही आरक्षण रह करण्याचा विचार करू, सध्या अशी परिस्थिती नाही,” असेही राहुल गांधी म्हणाले.
भाजपने त्यांच्या या विधानावर टीका करताना, ‘आरक्षणाबाबतचा त्यांचा द्वेष उघड झाला आहे,’ असा दावा केला आहे. “राहुल गांधी हे राज्यघटना वाचवत असल्याचा दावा करतात, मात्र अमेरिकेत गेल्यावर आरक्षण रह करण्याबाबत बोलतात. आरक्षणाबाबतचा त्यांचा द्वेप दिसून आला आहे. त्यामुळे राज्यघटना वाचविण्याची त्यांची मोहीम ढोंग असल्याचे स्पष्ट झाले आहे,” अशी टीका भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी हेदेखील आरक्षणाच्या विरोधात होते, असाही दावा रविशंकर यांनी केला. राहुल यांच्या या विधानावर एम. के. स्टॅलिन, लालाम्साद यादव, अखिलेश यादव आणि डाव्या पक्षांनी मौन सोडावे, असे आवाहनही त्यांनी केले.