राहुल गांधींच्या आरक्षणाच्या वक्तव्याचा भाजपाकडून जाणीवपूर्वक प्रचार,मात्र आरक्षण विरोधी भाजपाच— किशोर बोरकर
अमरावती
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवून सर्व समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळावा अशी जाहीर भूमिका देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच घेतल्यामुळे भाजपाचे नेते हैराण झाले असुन अमिरीकेतील एका कार्यक्रमातील खासदार राहुल गांधी यांच्या आरक्षणाबाबत अर्धवट टिप्पणी जनतेला भाजपा नेते आंदोलन करून सांगत आहेत, भाजपाच्या नेत्यांची दोगली भुमिका व आरक्षणाचा खरा विरोधक भाजपा असल्याचा देशातील जनतेला चांगल्याप्रकारे ठावुक असल्याचे टिका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केली असुन ते पुढे म्हणाले की,आज जाती,जातीत व अल्पसंख्याक , मागासवर्गीय व इतर समाज घटकांमध्ये दहशतीचे भीतीचे वातावरण भाजपाने निर्माण केले आहे.खोटे बोलण्यात व खोटे आश्वासन देण्यात भाजपाचे नेते पटाईत असुन मागील वेळेस सरकार सत्तेवर आल्यास पहील्याच कॅबिनेट मध्ये धनगर समाज बांधवांना आरक्षणाचा निर्णय करण्यात येईल.असे जाहीर आश्वासन देवेंद फडणवीस यांनी दिल्या मुळे भाजपाचे सरकार सत्तेत आले होते. आज या घोषणेला 10 वर्षे होत आहेत, धनगर समाज बांधवांचे पंढरपूर येथे व राज्यात इतर ठिकाणी आक्रमक आंदोलन सुरू असुन धनगर समाजाचे युवक आत्महत्या करीत आहेत .
आज राज्यात व केंद्रात भाजपाचे सरकार असल्यामुळे हिंमत असेल, तर धनगर समाज बांधवांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षण देवुन ओबीसी व मराठा समाजाला सुध्दा आरक्षणाचा निर्णय करावा,मग तेव्हा कुठे राहुल गांधी यांचेवर आरोप करावा.असे खरमरीत खडे बोल किशोर बोरकर यांनी भाजपला केले आहेत.
देशातील बेरोजगारांना 2 कोटी नौकऱ्या देण्याची पंतप्रधान मोदींनी केलेल्या घोषणेचे काय झाले,किती बेरोजगारांना नौकऱ्या भाजपाच्या सरकारने दिल्या,असा सवाल किशोर बोरकरांनी केला असुन ते पुढे म्हणाले की, देशातील उद्योगपतिंचे 20 हजार कोटींचे कर्जे मोदीजींनी माफ केले मात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. भाजपा सरकार कंत्राटी पद्धतीने नौकर भरती करीत असल्यामुळे संविधानाने दिलेले आरक्षणच गडप करण्यात येत असुन आरक्षणाचे खरे विरोधक भाजपा असल्याचा असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केला आहे.
—————————————————————————————–