ईद-उल-मिलादुन्नबीचा पर्व विकासातून समृद्धीकडे नेणारा उत्सव – आ.सौ.सुलभाताई खोडके..
शाही जुलूसचे स्वागत…मुस्लिम बांधवाना पुष्पभेट देऊन दिली मुबारकबाद..
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१६ अमरावती
ईद-उल-मिलादुन्नबीचा पर्व हा हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्माचा पर्व असून समाजाला अंधाराकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा पर्व आहे. शांती,सभ्यता, नीतिमत्ता व मानवतेची शिकवण देणारा हा एक लोकोत्सव आहे. जीवनात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे झालेल्या चुकांची क्षमाचायाचना करून सदाचाराचा मार्ग अवलंबित सर्वानी विकासाच्या ध्येयाने प्रेरीत होऊन समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन करीत आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी सर्वांना ईद-उल-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
सालाबादाप्रमाणे ईद-उल-मिलादुन्नबीचा पर्व सोमवार दिनांक १६सप्टेंबर २०२४ रोजी सर्वत्र साजरा करण्यात आला. अमरावती शहराच्या मुस्लिम बहुल भागातही जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीचा उत्साह दिसून आला. याप्रसंगी आ.सौ. सुलभाताई खोडके व राष्ट्र्वादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांनी जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन अनुयायांसमवेत समरस होऊन ईद-ए-मिलाद चा आनंद द्विगुणित केला. यानिमित्याने शहरातून शाही जुलूस काढण्यात आला. यामध्ये सर्व अनुयायी मोठ्या श्रद्धेने व पारंपरिक पद्धतीने सहभागी झाले असता समाजाच्या एकतेचे दर्शन घडून आले. दरम्यान आमदार महोदयांनी भव्य शाही जुलूसचे स्वागत करीत पुष्पदेऊन अनुयायांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या चांदणी चौक स्थित जनसंपर्क कार्यालय समोर जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीच्या कार्यक्रमात अनुयायांना शुभेच्छा देण्यात आल्या.
पैगंबर हजरत मोहम्मद यांनी नेहमी शांततेचा संदेश देऊन मानवतेचा पुरस्कार केला. त्यांचे विचार व संदेश हे समाजाला जीवनाचा सन्मार्ग दाखविणारे असून अनुयायांनी त्यांच्या विचारांचे पाईक होण्याचे आवाहन सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी मुस्लिम धर्मगुरू यांचे सुद्धा आमदार महोदयांनी आशीर्वचन घेऊन विश्वकल्याणाची मनोकामना केली. दरम्यान अनुयायांचे जथ्ये च्या जथ्ये उसळले असता समाजाच्या धार्मिक व सांस्कृतिक सभ्यतेचे दर्शन घडून आले. याप्रसंगी मुस्लिम धर्मगुरू व मौलवी यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले असता त्यांनी शुभेच्छांचा स्वीकार करत आमदार सौ. सुलभाताई खोडके यांना आशीर्वचन प्रदान केले. तसेच युवक बांधवापासून तर अबाल वृद्धांना शुभेच्छा देऊन आमदार महोदयांनी त्यांचा आनंद द्विगुणित केला . ईद-ए-मिलाद च्या निमित्ताने खुदाची प्रार्थना व इबादत करण्यात करण्याला घेऊन घेऊन अनुयायांमध्ये एकच उत्सुकता दिसून आली. यावेळी जनसंपर्क कार्यायलाच्या वतीने जुलूस मधील अनुयायांसाठी शीतपाणी व शरबतची व्यवस्था करण्यात आली होती. जश्ने ईद -ए-मिलादुनब्बीच्या कार्यक्रमात बहुसंख्य नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.