अखेर आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल, काँग्रेस आक्रमक
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१७ बुलढाणा
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भातील विधानावरून जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करीत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. यानंतर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. यामुळे शहरात राजकीय तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.
राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याविरोधात बोलताना संजय गायकवाड यांनी सोमवारी प्रक्षोभक विधान केले होते. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देईल, असे त्यांनी जाहीर केले होते.संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे तक्रार निवेदन देण्यासाठी काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विजय अंभोरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्ष मंगला पाटील, प्रदेश सचिव जयश्री शेळके, सुनील सपकाळ, रिजवान सौदागर, बुलढाणा शहराध्यक्ष दत्ता काकस, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते.तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड यांनीही बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सर्व काँग्रेस पदाधिकारी यांच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली. यात आमदार गायकवाड यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.बुलढाणा शहर पोलिसांनी अखेर सोमवारी रात्री उशिरा आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध दखलपात्र गुन्हे नोंदवले. यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेत ‘एफआयआर’ची प्रत घेऊनच काँग्रेस नेते पोलीस ठाण्याच्या बाहेर पडले. काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांच्या तक्रारीवरून आमदार गायकवाड यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम १९२, ३५१(२), ३५२(३), ३५२(४) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
काँग्रेस नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया
गुंड कोणाला म्हणायचं मुख्यमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या आमदारांना गुंड म्हणायच..गृहमंत्र्यांना गुंड म्हणायचं की त्यांच्या नेत्यांना गुंड म्हणायचं..हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रा सोबत छेडखानी करने चुकीचे आहे.जे सत्ताधारी आहेत त्याना दंगल करायची आहे.आता तेवढाच पर्याय त्यांच्या कडे आहे.
खबरदार महाराष्ट्रला इजा केली तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आहे..
कुठल्याही परिस्थितीत संजय गायकवाड वर गुन्हा दाखल झाला पाहिजे.सुमोटो कारवाई करा –
आ. यशोमती ठाकूर आमदार
गायकवाड यांना तातडीने अटक करा,” -किशोर बोरकर.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्यांस 11 लाखांचे बक्षिस जाहीर करणारे मस्तवाल आमदार संजय गायकवाड या गुंड प्रवृत्तीच्या आमदारांचा जाहीर निषेध महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किशोर बोरकर यांनी केला असून ते म्हणाले कि, जननायक राहुल गांधी यांची दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकप्रियता भाजपा व त्यांच्या मित्रपक्षाला सहन होत नाही, त्यामुळे निराश झालेले सत्ताधारी राहुलजीच्या वक्तव्याची मोडतोड करून त्यांची खोटी बदनामी करीत असल्याचा आरोप किशोर बोरकर यांनी केला असून ते म्हणाले की,राज्यात,व देशात जेव्हापासून भाजपाचे सरकार आल्यापासून, महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे पुतळे उभारणे,देशाचे संविधान बदलविण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत,व भाजपाच्या माजी आमदाराने राहुल गांधी यांना जीवे मारण्याची जाहीरपणे धमकी देणे,हि सर्व काळे क्रुत्य देशाच्या संविधानाची पायमल्ली करणारे असुन भाजपा अशा देशविघातक प्रवुत्तीस प्रोत्साहन देत असल्याचे उघडपणे देश बघत आहे.मस्तवाल आमदार संजय गायकवाड यांचा बंदोबस्त काँग्रेस कार्यकर्ते एका क्षणात करू शकतात, परंतु ते आमचे संस्कार नाहीत.असा सज्जड दम किशोर बोरकर यांनी दिला असून मस्तवाल आमदार संजय गायकवाड हे अजुनही आपल्या देशविघातक वक्तव्यावर ठाम असल्याचे प्रसार माध्यमातुन प्रसिद्ध झाले आहे.तेव्हा आमदार संजय गायकवाड यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी किशोर बोरकर यांनी केली आहे.
————————————–