यवतमाळ – चिखलदरा चालती बस पेटून जळून राख
चालकाच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप
दि.१९चिखलदरा
मेळघाटच्या वळण रस्त्यावर दररोज अनेक अपघात होत आहेत. दरम्यान, बुधवारी रात्री आठ वाजता मोथा गावाजवळील राज्य परिवहन महामंडळाच्या यवतमाळ- चिखलदरा या ‘लालपरी’ला अचानक आग लागल्याने संपूर्ण बस जवळपास जळून खाक झाली. मात्र सुदैवाने चालकाच्या सतर्कतेने या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप बचावले.
प्राप्त माहितीनुसार बुधवारला रात्री ८ वा. दरम्यान नेर आगाराचीयवतमाळ- चिखलदराही (एमएच ४० एक्यू ६१६९ ) बस जात असताना घाट वळणात मोथा गावाजवळ अचानक पेटली. चालकाच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ बस थांबवून सर्व प्रवाशांना तत्काळ सुखरुप बाहेर काढले. आणि पाहता पाहता सर्व बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. घटनेची माहिती मिळताच चिखलदरा एसएचओ पिडूकर हे ही त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले.धावत्या बसमधील इंजिन जवळ अचानक आग लागल्याने चालक हुकूम चौहान व वाहक गोविद लांजेवार यांनी सतर्कता दाखवत तत्काळ बस थांबवून प्रवाशांना सुखरूप बसमधून खाली उतरवले. तर शेख नसीर ठेकेदाराने आग विझविण्यास मदत केली.
हि बातमी पण वाचा – डॉ. बोंडे पुन्हा काय म्हणालेत ?
दररोज आपल्या मोबाईल वर वाचा मराठी सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक
आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
चालत्या बसला अचानक आगलागल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून शहरात वाऱ्यासारखी पसरली. हे ऐकून शहरातील समाजसेवेसाठी सदैव तत्पर असलेले शेख नासीर अब्दुल गनी यांनी आपला वैयक्तिक पाण्याचा टँकर पाठवून आग आटोक्यात आणण्यास मदत केली. सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत सर्व बस जळून खाक झाली होती.