यशोमती ठाकूर यांना कसला अंहकार? खासदार बोंडेंवरून वहिनीसाहेबांनी नणंदबाईंना भरला दम
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१९अमरावती
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधींवर केलेल्या वादग्रस्त विधानावरून काँग्रेस आक्रमक झालीय. राज्यातील अेक ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे. तर अमरावतीत वहिनीसाहेब आणि नणंदबाई आमनेसामने आले आहेत. आमदार यशोमती ठाकूर यांनी खासदार बोंडे यांना खडेबोल सुनवाल्यानंतर भाजप नेत्या नवनीत राणा यांनी त्यांना प्रतित्तुर दिलंय.
विजय हा पचवता आला पाहिजे. विजय हा उतू जात आहे. अमरावतीची जनता येत्या काळात तुम्हाला नक्की धडा शिकवेल, अशा शब्दात अमरावतीच्या भाजप नेत्या नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांना सुनावले आहे. यामुळे अमरावतीत बोंडे यांच्या विधानावरून वहिनीसाहेब आणि नणंदबाई यांच्या वाद पेटलाय.काल पोलीस आयुक्त यांच्या दालनात तमाशा झाला. यशोमती ठाकुर माझी नणंद बाई यांनी त्या ठिकाणी अनिल बोंडे यांना शिवीगाळ केली. कधी खासदाराला धक्के मारणे खासदारांला हरामखोर म्हणणे. ही पद्धत एका राजकीय नेत्याला शोभण्यासारखी नाही.
ही बातमी पण वाचा — विदर्भाच्या राजाची निघणार भव्य मिरवणूक
लोकशाहीत आपले मत मांडण्याचा सगळ्याना अधिकार आहे.महिला नेत्यांच्या तोंडी, अशी भाषा शोभत नाही ही अमरावतीची संस्कृती नाही, अशी टीका करतांना राणा यांनी लोकसभा निवडणुकीच्या विजयावरूनही ठाकूर यांचा वचपा काढलाय. यशोमती ठाकूर यांना नेमका अहंकार कशाचा आहे.कुणी पराभूत होते कोनी निवडून येते. विजय हा पचवता आला पाहिजे. विजय उतू येत आहे. अमरावतीची जनता येत्या काळात तुम्हाला नक्की धडा शिकवेल, असा सणसणीत टोला त्यांनी यशोमती ठाकूर यांना लगावलाय.
ताज्या बातम्यांचे अपडेट व सविस्तर बातम्या वाचा सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक वर
आजच आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा !