शहरात विजेच्या कडाक्यासह पावसाला जोरदार सुरुवात
अमरावती
अति वायव्य राजस्थान व कच्छ परिसरातून वायव्य वारा, खालावणारी आर्द्रता व इतर काही वातावरणीय बदलानुसार सोमवारी (दि.२३)पासून मान्सून परतण्याची शक्यता जाणवत आहे, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. राज्यात काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शहरात आज पाच वाजताच्या सुमारास विजेच्या कडाक्यासह पावसाला सुरुवात झाली असून दि.२१ ते २४ पर्यंत हा पाऊस राहणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली.
मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी मुग, उडीद व सोयाबीन या पिकांची काढणी करावी. तसेच शेतमाल हा कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवावे. जेणेकरून शेतमालाचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी.पावसाचा अंदाज लक्षात घेऊन आपले पशुधन कोरड्या आणि सुरक्षित जागी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.