अप्पर वर्धा धरणाचे 9 गेट उघडले
वर्धा नदीच्या पात्रात ५१४ घन.मी.से.ने पाण्याचा विसर्ग
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मोर्शी
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाचे १३ पैकी ९ गेट रविवारला रात्री ८ वा. ३५ सेंटिमीटरनेउघडण्यात आली. त्यामधून ५१४ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
वर्धानदीचे पाणलोट क्षेत्र हे मध्यप्रदेशात आहे. या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळं मध्य प्रदेशातील जाम आणि माडु नदीला आलेल्या पुर आला असून यामुळे अप्पर वर्धाच्या पातळीत वाढ झाल्याने हा विसर्ग करण्यात येत आहे.
जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या संततधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढहोत आहे. ही बाब लक्षात घेऊन रविवारला रात्री धरणाची ९ दारे उघडण्यात आली.
उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामधे जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जलाशय पातळी ३४२ मी. (१००%) पर्यंत गेली होती. ही पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी रविवारला ८ वा. पासून वर्धा नदी पात्रात विसर्ग २०५ घन.मी/से. वरून वाढवून आता ५१४ घन.मी/से. एवढा करण्यात आहे. तसेचसध्याच्यास्थितीत९ दरवाजेप्रत्येक ३५ से.मी. मधून एकूण विसर्ग ५१४ घन. मी/से पाणी वर्धा नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
राज्यासह अमरावती जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या वाचा आता आपल्या मोबाईलवरच
सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक च्या ग्रुपला जॉईन व्हा !