सेमाडोह जवळ चावला कंपनीची खाजगी बस पूलावरून कोसळली खाली
दि.२३ मेळघाट
खासगी प्रवासी बस पुलावरुन नदीत कोसळल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मेळघाटातील सोमाडोह परिसरात दारणीजवळ घडली. या बसमधील अनेक प्रवाशांना मोठी दुखापत झाल्यानं घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. सुदैवानं अद्यापही या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मेळघाटात सेमाडोहलगत अमरावतीवरुन धारणीकडं जाणारी ट्रॅव्हल्स बस पुलावरुन नदीत कोसळली. या अपघातामुळे सेमाढोह परिसरात खळबळ उडाली असून बसमधील अनेक प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. ही खासगी बस अमरावतीवरुन धारणीला निघाली होती. खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची बस नेहमीप्रमाणं सकाळी सहा वाजता अमरावती येथून धारणीला निघाली. सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सेमाडोह इथल्या भूतखोरा परिसरात धोक्याच्या वळणावर असणाऱ्या नदीच्या पुलावर बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही बस पुलाखाली नदीत कोसळली.
हा अपघात घडताच सेमाडोह इथले नागरिक घटनास्थळी धावून गेले. व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी देखील घटनास्थळी पोहोचले. नदीत कोसळलेल्या अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या अपघाताची माहिती परतवाडा, चिखलदरा आणि धारणी पोलिसांना देण्यात आली. या तिन्ही शहरातून बचाव पथक अपघातस्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या अपघातात 30 ते 40 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे
सर्व जखमी प्रवाशांवर लगतच्या सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे.
अपघात झाल्यानतंर परिसरातील नागरिक मदतीला धावले आहेत
ताज्या बातम्यांचे अपडेट वाचा दररोज आता आपल्या मोबाईलवरच
सांध्य दैनिक विदर्भ प्रजासत्ताक मध्ये [ नियमित प्रकाशित ]
आजच आमच्या ग्रुप ला जॉईन व्हा !