अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी नवनीत राणा पोहचल्या जिल्ह्या सामान्य रुग्णालयात
गंभीर रुग्णांना दिला धीर केली
दि.२३ अमरावती
अमरावतीहून धारणी येथे जात असलेली खासगी प्रवासी बस सेमाडोह नजीक पुलावरून कोसळून झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून २५ प्रवासी जखमी झाले आहेत. सात जण गंभीर जखमी असल्याने त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती होताच नवनीत राणा या सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहचल्या व गंभीर रुग्णांना धीर दिला तर उर्वरित १८ जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची माहिती हि नवनीत राणा यांनी घेतली.
या भीषण घटनास्थळीत चार जण दगावले होते तर दोघे उपचारासाठी रुग्णवाहिकेतून परतवाड्याच्या दिशेने निघाले असतानाच रस्त्यात दगावल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.अपघातानंतर तत्काळ मदत कार्य सुरू करण्यात आले.घटनेची माहिती अमरावती मध्ये नवनीत राणा यांना सुद्धा मिळाली असता नवनीत राणा या तातडीने जिल्ह्या सामान्य रुग्णालयात पोहचून सर्व जखमी रुग्णांची चौकशी केली. यावेळी नवनीत राणांनी प्रत्येक जखमींची चौकशी केली व अपघाताबद्दल माहिती घेतली व लगेच सीएस सोबत बोलून तातडीने इलाज करण्याचे निर्देश दिलेत. नवनीत राणा यांना संपूर्ण मेळघाट मधील आदिवासी बांधव यांना मेळघाटचे मुलगी म्हणून त्यांच्या कडे पाहतात त्याच तपरतेने नवनीत राणा या आज पुन्हा अपघातग्रस्तांसाठी आज धावून गेल्यात हे विशेष
गेल्या २४ मार्च रोजी सेमाडोह नजीक एसटी महामंडळाची बस खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला होता, तर २५ जण जखमी झाले होते. बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला होता. त्यावेळेस नवनीत राणा या मेळघाट दौऱ्यावर होत्या त्या हि वेळी नवनीत राणा या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावून गेल्या होत्या त्यामुळे मेळघाट मधील समस्त आदिवासी बांधव नवनीत राणाना मेळघाट ची मुलगी म्हणून बघतात.