आसेगाव येथे बच्चू कडू यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन
प्रहार कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने लागले कामाला
बच्चू कडू यांच्या विजयाची घेतली शपथ
आसेगाव
अचलपूर विधानसभा क्षेत्रातील आसेगाव येथे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांच्या प्रचार कार्यालयाचे सामान्य मतदारांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. बच्चू कडू यांच्या आदेशाची प्रतीक्षा न करता प्रहार कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कामाला लागत आसेगाव परिसरात प्रचाराला प्रारंभ केला. शेकडो प्रहार कार्यकर्ते व समर्थक या प्रचार कार्यात लागले असून सर्वांनी बच्चू कडू यांच्या विजयाची शपथ घेतली.
या प्रचार कार्यालयाचे उदघाटन प्रहार चे प्रदेश प्रवक्ते जितू दुधाने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रदेश सचिव नंदकिशोर कुयटे,तालुकाध्यक्ष संतोष किटूकले,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज वाटाणे, श्री अश्विन भेटाळू संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती,माजी सभापती राजेश वाटाणे,प्रशांत नागपुरे,मोहन खंडारे,वासुदेव ठाकरे,मोहन नेरकर,रामभाऊ रामटेके,सलाम सौदागर, मोहनराव धवे, गजाननराव भेटाळू, भैय्यासाहेब मानकर, बाळासाहेब गवई, दिनेश तंतरपाळे, राजीक हुसेन, मुजफ्फर भाई, नंदू लव्हाळे विनोद कोळसकर आदी मान्यवर उपस्थित होते.
जितू दुधाने यांनी यावेळी संबोधित करतांना म्हटले की, बच्चू कडू यांच्या सारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत असणे ही काळाची गरज आहे.गोरगरीब, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर यांचा आवाज विधानसभेत जर कुणी उठवत असेल तर ते एकमेव बच्चू कडू आहेत असा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.परिवर्तन महाशक्तीद्वारे बच्चू कडू संपूर्ण महाराष्ट्रात इतिहास रचणार आहेत अश्यावेळी बच्चू कडू सारख्या लोकनेत्याला बहुमताने निवडून देण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे त्यामुळे बच्चू कडू यांना भरघोस मतांनी निवडून आणा असे आवाहन यावेळी जितू दुधाने यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक, प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.