प्रियंका विश्वकर्मा यांनी मतदारांचे घेतले आशीर्वाद
धामणगाव रेल्वे शहरात महिलांचा प्रचंड प्रतिसाद
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश विश्वकर्मा यांच्या प्रचाराची रणधुमाळी त्यांच्या अर्धांगिनी प्रियंका विश्वकर्मा यांनी सांभाळली आहे. धामणगाव शहर पिंजून काढले असून त्यांनी घरोघरी जाऊन सिलेंडरला मत मागितले आहे. या दरम्यान शहरातील महीला व पुरुष मतदारांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद देऊन विजयी करण्याचे आश्वासन दिले आहे.
धामणगाव रेल्वे शहरात प्रचार रॅली दरम्यान प्रियंका विश्वकर्मा यांनी शहरातील साई नगर, शास्त्री चौक, गवळीपुरा, रुख्मिणी नगर, हरीहंत नगर, श्रीकृष्ण पेठ, चिंतामणी नगर, दालमिल चाळ परिसर, आंबेडकर नगर, गांधी चौक, पेठे नगर, आदर्श कॉलोनी परिसर व तुळजाभवानी मंदिर सर्कल या भागातून पदयात्रा काढली, या वेळी नागरिकांनी त्यांच्या या पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद दिला. तसेच जागो जागी स्वागत करण्यात आले, प्रियंका विश्वकर्मा यांनी डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मत देऊन भरघोष मतांनी निवडून आणण्याचे मत मतदारान समोर मांडले. धामणगाव रेल्वे मतदार संघात विविध योजना आणून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन प्रियंका विश्वकर्मा यांनी मतदाराणा दिले. भाजप व कॉग्रेस यांनी आलटून पालटून सत्ता भोगून गरीब जनतेवर अन्याय केला आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी कमिशन खोर सरकार ला खाली खेचण्यासाठी एकत्र येऊन डॉ. निलेश विश्वकर्मा यांना मतदान करण्याचे आव्हान प्रियंका विश्वकर्मा यांनी केला आहे. शहरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन प्रचंड प्रतिसाद दिला. निलेश विश्वकर्मा यांची उमेदवारी राजकारण नसून जन सामान्यांना न्याय देण्याकरिता व मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधण्याकरिता आहे, असे प्रियंका विश्वकर्मा यांनी प्रचार रॅली दरम्यान सांगितले. या वेळी महिलांची प्रचंड गर्दी होती.
धामणगाव रेल्वेत नवीन कार्यालय चे उद्घाटन
शहरातील शास्त्रीय चौकात शनिवारी नवीन कार्यालाचे उद्घाटन डॉ. प्रकाश विश्वकर्मा, जि.पी. विश्वकर्मा यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले या वेळी प्रशांत नाईक, प्रल्हाद कोहळे, सागर ढोले, सुरेंद्र फुसाटे, राजू फुसाटे, अनिल पतालिया, महेश विश्वकर्मा, ओमप्रकाश विश्वकर्मा, सौ. सारिका ढानके, रत्ना रंगारी, संतोष विश्वकर्मा यांच्या असंख्य नागरिक उपस्थित होते.
@ विदर्भ प्रजासत्ताक