डॉ. नीलेश विश्वकर्मा यांना मतदारसंघात प्रचंड प्रतिसाद
धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मतदारांचा कौल
धामणगाव रेल्वे :
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी धामणगाव रेल्वे मतदारसंघातील तिनही तालुके पिंजून काढले असून मतदारांनी त्यांना भरघोस असा प्रतिसाद दिला आहे.
डॉ. नीलेश विश्वकर्मा हे गेल्या पंधरा दिवसांपासून निवडणुकीतील रणधुमाळी मतदारसंघातील तिनही तालुक्यातील करीत आहे. आतापर्यंत तिनही मतदारसंघ त्यांनी पिंजून काढले आहेत. धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषत: युवा वर्ग डॉ. नीलेश विश्वकर्मा यांच्याकडे आकर्षित होत आहे. गेल्या चाळीस वर्षापासून धामणगाव रेल्वे मतदारसंघावर भारतीय जनता पार्टी व काँग्रेसचे अधिराज्य आहे. मागील निवडणुकीत डॉ. नीलेश विश्वकर्मा यांचा निसटता पराभव झाला. परंतु यावेळी पुन्हा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. डॉ. नीलेश विश्वकर्मा हे गेल्या पाच वर्षापासून मतदारसंघात कार्यरत आहे. गोरगरीब जनतेच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आहेत. कोरोना काळात डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी केलेले कार्य व युवा वर्गासाठी केलेली मदत या सर्व बाबीची जाण मतदारसंघातील युवा वर्गाने बोलून दाखविली आहे. लाडकी बहिण योजना राबवून राज्य शासनाने त्यांच्या घरातूनच डबल पैसे उकळण्याचा सपाटा सुरु केला आहे. लाडकी बहिण योजना ही फसवी असल्याचे डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी मतदारसंघात प्रचार रॅलीदरम्यान मतदारांना समजावून सांगितले. सोयाबीनला भाव नसल्याने बेभाव विक्री केल्या जात आहे. या सर्व बाबीवर पुढील काळात गांभीर्याने लक्ष दिल्या जाईल, असे डॉ. नीलेश विश्वकर्मा यांनी मतदारांना सांगितले. मतदारांनी त्यांना प्रचंड प्रतिसाद देऊन यावेळी विधानसभेवर त्यांना पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.