
बडनेऱ्यात विना परवाना खाद्यपदार्थ सर्रास विक्री !
नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०बडनेरा
बडनेरा कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर त्याकरिता एफडीए नोंदणी करणे अनिवार्य आहे. व्यवसाय करताना कुठल्या नियमाचे पालन केले पाहिजे, यासंदर्भात काही नियम अटी ठरवून दिलेले आहेः मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणारे व्यवसाय फोफावले आहेत. कुठल्याही चौकात अतिक्रमण करून ठिकठिकाणी उघड्धावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या हातगाड्या लागल्या दिसून येत आहे.

शहरात या व्यवसायातून दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत आहे. तथापि जन आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. लाखो रुपयाच्या या व्यवसायासाठी सर्व नियमांना व्यवसायाकडून तिलांजली दिली जात असल्याचे वास्तव आहे. दूषित पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तसेच अनेक ठिकाणी तर स्वच्छता केली जात नाही. ज्या ठिकाणी अन्नपदार्थ तयार केले जातात, तेथे घाणीचे साम्राज्य दिसून येते.
यामुळे रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करून त्या खाद्यपदार्थ रस्त्यावरची धूळ तसेच माशा बसलेल्या दिसून येतात.

त्यामुळे आरोग्यास घातक ठरू शकते, याकडे अन्न प्रशासन विभाग कोणत्याच प्रकारची कारवाई करताना वर्षभरात दिसून आले नाही.व्यवसाय करताना नोंदणी तसेच परवाना आवश्यक असताना या नियमाची कुठे पालन किंवा परवाना आवश्यक आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे तरी याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

तसेच उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली जात आहे.