
बोगस सातबाऱ्यावर शासकीय कापूस खरेदीचा धुमाकूळ
विदर्भ प्रजासत्ताक
दि.१०
शेतकऱ्यांच्या मागणीवरुन अंजनगावसुर्जी येथे कापसाची शासकीय खरेदी सुरू करण्यात आली. केंद्रावर आजपर्यंत दोन लाख तीस हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. बनावट सातबाऱ्यावर काही संचालक, व्यापारी, जिनींग प्रेसींग व्यावसायिकांनी शासकीय कापूस खरेदीचा धुमाकूळ चालविला आहे.

आजपर्यंतच्या शासकीय खरेदीत काही सहकाराचे संचालक, व्यापारी, जिनीग प्रेसीग व्यावसायिकांनी हजारो क्विंटल कापूस खरेदी बोगस व डुप्लीकेट सातबाऱ्यावर केलेली असताना सीसीआयच्या उशिरा सुचलेल्या शहानपणामुळे महिला, दिव्यांग, सत्तर- पंचाहत्तरी पार केलेल्या सातबारा धारकांना हजर राहत कापूस तोलून घ्यावा लागत आहे.

शासनाचे कापूस खरेदी योजनेत आजपर्यतच्या खरेदीत या व्यावसायिकांनी शेतकऱ्यांकडून कमी भावात शेतमाल खरेदी करुन तोच शेतमाल जवळच्या नातेवाईक, संबंधित गरजू शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर विकून शासकीय खरेदीला (सीसीआय) चुना लावल्या जात असल्याची पात्र शेतकऱ्यांची ओरड तालुक्यात सुरू आहे.