
एसटी परिवहन महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ…
शिवशाही बस चा टायर चालत्या प्रवासातच निघाला
@ विदर्भ प्रजासत्ताक
अमरावती वरून नागपूरला जाणाऱ्या भरधाव शिवशाही एसटी बसचा चालक साईडचा पुढचा टायर आपोआप निघाला व मोठा अपघात होता होता थोडक्यात वाचला
अमरावती आगारातून आज सकाळी शिवसाहहि बस हि नागपूर करीत रवाना झाली मात्र काही अंतरावर गेल्या नंतर या शिवशाही बसचा चालक साईडचा चाक आपोआपच निघून बाहेर पडले. भरधाव बसचा टायर निघून लांब अंतरावर गेला तर
या वेळी बस काही अंतररावर घासत गेली मात्र चालकाच्या प्रसंगवाधनामुळे मोठा अपघात होता होता
थोडक्यात 50 पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव वाचला.अमरावती नागपूर महामार्गावरील धक्कादायक घटना घडली आहे त्यानंतर सर्व प्रवासी भर उन्हात रस्त्यावरच उभे होते.
काही दिवसांपूर्वी परतवाडा आगाराच्या बसचा ही अशाच प्रकारे टायरनिघाला होता ..
एसटी महामंडळाचे बसच्या मेंटनस कडे दुर्लक्ष असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे
सविस्तर बातमी थोद्याच वेळात अपडेट होत आहे तर वाचत रहा विदर्भ प्रजासत्ताक