
‘नवनीत’चे AI च्या जगात पहिले पाऊल, ठरली देशातील पहिली कंपनी
शिक्षण क्षेत्रातील अग्रणी असलेल्या नवनीत एज्युकेशन लिमिटेडने ‘नवनीत एआय’ लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण क्षेत्रात देशात पहिलं पाऊल टाकणारी कंपनी नवनीत एज्युकेशन लिमिटेड ठरली आहे. शिक्षकांना ज्ञानाचा आणि संसाधनांचा सुलभपणे वापर करता यावा या दृष्टीने हा नवा उपक्रम तयार करण्यात आला आहे. नवनीतच्या समृद्ध शैक्षणिक साहित्याचा आधार घेत, ‘नवनीत एआय’मधील साधनांमुळे शिक्षकांना अधिक प्रभावीपणे शिकविण्यास मदत होईल. हे व्यासपीठ इंटरअॅक्टिव्ह आणि वापरण्यास सोपे आहे. याच्या मदतीने शिक्षक क्विझ, गृहपाठ, पीपीटी, फ्लॅशकार्ड, सारांश आणि अन्य शैक्षणिक साहित्य सहज तयार करू शकतील.

अनेक दशकांपासून देशभरातील शिक्षक आणि विद्यार्थी नवनीतच्या अभ्यासासंबंधी पुस्तकांचा आणि संसाधनांचा वापर करत आहेत. नवनीत डायजेस्ट, वर्कबुक, नवनीत २१ मोस्ट लाइकली क्वेश्चन सेट्स, प्री-प्रायमरी आणि मुलांसाठी प्रकाशित पुस्तकांमुळे शिकणे सोपे झाले आहे. आता ‘नवनीत एआय’च्या माध्यमातून ५०,०००हून अधिक संसाधने नव्या स्वरूपात सादर करण्यात येत आहेत. या संसाधनांमुळे अभ्यास करण्याचा अनुभव अधिक आकर्षक आणि प्रभावी होईल. या नव्या व्यासपीठामुळे शिक्षकांना डिजिटल साधने उपलब्ध होणार आहेत. या सधानांमुळे अध्यापन अधिक सोपे आणि परिणामकारक होईल. पारंपरिक शैक्षणिक संसाधनांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून शिक्षण अधिक प्रभावी करण्याचा नवनीत एज्युकेशनचा प्रयत्न आहे.

“नवनीत एआयच्या माध्यमातून शिक्षकांसाठी अध्ययन-साहित्य अधिक सुलभ आणि त्यांच्या गरजेनुसार लवचिक करणे, हा आमचा उद्देश आहे” असे नवनीत एज्युकेशन लिमिटेडचे ब्रँडिंग, मार्केटिंग आणि सेल्स डायरेक्टर देविश गाला म्हणाले. ते पुढे म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञान आणि विश्वासार्ह शैक्षणिक साहित्याची सांगड घालून आम्ही शिक्षकांना नवीन पिढीला प्रेरित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये पाठबळ देत आहोत. आम्ही तांत्रिक प्रगतीसोबत पुढे जात राहू आणि बदलत्या शैक्षणिक गरजा पूर्ण करू, या संकल्पाचा हा प्रकल्प एक भाग आहे.”

नवनीत एज्युकेशन लिमिटेडच्या टॉपटेकचे सीईओ हर्षिल गाला यांनी सांगितले की, नवनीत एआयमुळे शिक्षण पद्धतीत मोठा बदल घडत आहे. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी दोघांसाठीही शिकण्याची प्रक्रिया अधिक इंटरअॅक्टिव्ह आणि प्रभावी होत आहे.
नवनीत नेहमीच शिक्षणातील नवकल्पनांचा अग्रणी राहिला आहे. या नवीन टूलच्या मदतीने कंपनी एक मोठे पाऊल पुढे टाकत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षक अधिक सक्षम होतील आणि विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक प्रभावी होईल.
नवनीत एआय हे भारताचे पहिले कस्टम शिक्षण मॉडेल आहे. सध्या जनरल एआय चॅटबॉट्स विद्यार्थ्यांसाठी स्टडी असिस्टंट म्हणून वापरले जात आहेत. अशा परिस्थितीत नवनीतने शिक्षकांसाठी विचारपूर्वक विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेतला. ही एआय यंत्रणा मल्टी-एजेंट आर्किटेक्चरवर काम करते, जिथे प्रत्येक विशेष एजंट आउटपुट अधिक चांगले करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. यात करिक्युलम अलाइनमेंट एजंट, कंटेंट स्ट्रक्चरिंग एजंट, व्हिज्युअल डिझाइन एजंट, असेसमेंट क्रिएशन एजंट, क्वालिटी व्हेरिफिकेशन एजंट आणि अन्य एजंट्स समाविष्ट आहेत. या सर्व एजंट्समुळे एकत्रितपणे शैक्षणिक साहित्याची अचूकता, स्पष्टता आणि परिणामकारकता सुनिश्चित होते.या संरचनेमुळे शैक्षणिक मानकांचे पालन सुनिश्चित होते आणि प्रभावी शिक्षणासाठी भक्कम पाया तयार होतो. हे सर्व नवनीतच्या विश्वासार्ह साहित्याच्या वापरामुळे शक्य झाले आहे, जे सहा दशकांच्या अनुभवाने आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून विकसित करण्यात आले आहे. हा नवोपक्रम अनेक वर्षांच्या सखोल अभ्यास आणि प्रयोगांमधून तयार झाला आहे. त्यामुळे तो नाविन्यपूर्ण आणि किफायतशीर ठरतो. संकल्पनेपासून अंमलबजावणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्याचा उपयोग होतो.
नवनीत एज्युकेशन लिमिटेड शिक्षकांना ‘नवनीत एआय’ची माहिती देण्यासाठी आणि त्याचा पूर्ण उपयोग करता यावा यासाठी Q&AI विद नवनीत एआय या कार्यशाळांची मालिका आयोजित करणार आहे. या कार्यशाळांचा उद्देश शिक्षकांना प्रत्यक्ष अनुभव देणे, त्यांच्या शंकांचे समाधान करणे आणि त्यांना या प्लॅटफॉर्मचा आत्मविश्वासाने वापर करता यावा याची खात्री करणे हा आहे. त्यामुळे त्यांची अध्यापन पद्धती अधिक प्रभावी बनेल.जसजसे शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे, तसतसे नवनीत शिक्षकांसाठी डिजिटल सहाय्यक उपलब्ध करून देत आहे. हे सहाय्यक शैक्षणिक उत्कृष्टतेची पारंपरा आणि डिजिटल नवकल्पना यांना एकत्र जोडते. ‘नवनीत एआय’च्या माध्यमातून कंपनी भारतातील शिक्षणाच्या भविष्याला अधिक सक्षम करण्याच्या आपल्या बांधिलकीवर शिक्कामोर्तब केले आहे, जेणेकरून परंपरा आणि तंत्रज्ञान याच्या एकत्रीकरणामुळे शिक्षणाचा अनुभव अधिक प्रभावी आणि आधुनिक होईल.